MNS meeting Live : मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची सूनही उपस्थित, मितालीने लक्ष वेधले

मनसेची आज बैठक होत आहे. या बैठकीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली (Mitali Thackeray) यांनी.

MNS meeting Live : मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंची सूनही उपस्थित, मितालीने लक्ष वेधले
मिताली ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 12:53 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची (MNS meeting) आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत. वांद्रे इथल्या MIG क्लबमध्ये होणाऱ्या या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे उपस्थित आहेतच. मात्र यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अमित ठाकरे यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सून मिताली (Mitali Thackeray) यांनी. (MNS meeting in Mumbai live in presence of Raj Thackeray son Amit and daughter  in law Mitali Thackeray attend )

अमित आणि मिताली हे दाम्पत्यही मनसेच्या आजच्या बैठकीला उपस्थित आहे. राज्यातील मनसेचे नेते , सरचिटणीस , प्रमुख शहराध्यक्ष बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर इथे चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर , अविनाश अभयंकर , गजानन काळे , विविध नेते उपस्थित आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी मनसेकडून विशेष समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. सर्व महापालिका स्तरावर ही एक कमिटी असेल. या कमिट्यांकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी असेल.

अमित-मितालीच्या लग्नाला दोन वर्षे

अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारी 2019 रोजी विवाह सोहळा संपन्न झाला. नुकतंच त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आहे. या दोन वर्षात आता अमित आणि मिताली हे दोघेही पक्षाचं काम करताना दिसत आहेत.

मनसेची पत्रकार परिषद, बाळा नांदगावकर LIVE

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे. लोकसभानिहाय सर्व वरिष्ठ नेते जातील आणि आढावा घेतील. अहवाल राज ठाकरे यांना दिला जाईल. 27 फ्रेब्रुवारीला मराठी भाषा दिनी , उत्सव म्हणून साजरा केला जाईल. मराठी स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः अनेक ठिकाणी स्वाक्षरी करण्यास जाणार आहेत. मराठी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.

मनसेच्या गटअध्यक्षांना आता नवीन नाव – राजदूत असेल

9 मार्च हा पक्षाचा वर्धापनदिन आहे. यावेळी निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 9 फ्रेबुवारी ते 12 एप्रिलपर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्याला जाणार आहेत. 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्यात जाणार आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

राज ठाकरे यांचा पुणे दौरा

दरम्यान, नुकतंच राज ठाकरे यांनी दोन दिवसांचा पुणे दौरा केला. राज ठाकरे 27 आणि 28 जानेवारीला पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील वरिष्ठ मनसे नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मनसे नेते बाबू वागस्कर आणि अनिल शिदोरे उपस्थित होते. येत्या पुणे महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एकूण 45 मिनिटं चर्चा झाली. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आजची बैठक आयोजित करण्यात आली.

संबंधित बातम्या   

VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक ‘कृष्णकुंज’वर, अमित-मितालीला शुभेच्छा!

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी-शाहांवर घणाघात, आता शेतकरी आंदोलनावर राज ठाकरे काय बोलणार? 

पुण्यात मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरेंचा दोन दिवस पुणे दौरा

(MNS meeting in Mumbai live in presence of Raj Thackeray son Amit and daughter  in law Mitali Thackeray attend)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.