अजित पवार यांच्यापाठोपाठ मनसेही भाजपसोबत येणार?, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले,…

महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही, याची काळजी आधी घेत होतो. यानंतरही घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्यापाठोपाठ मनसेही भाजपसोबत येणार?, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले,...
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 9:50 PM

मुंबई : भाजपा आणि मनसे युतीवरून चर्चा झाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपची ऑफर असल्याचं म्हटलं. त्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार का आणि राज ठाकरे जे बोलले त्यावर भाजपचं म्हणणं काय, हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांनी वांद्रे येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपची ऑफर असल्याचं सांगितलं. राज ठाकरे म्हणाले, मला भाजपची ऑफर आहे. पण, मी अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत आलेलो नाही. एकनाथ शिंदे भाजपसोबत आहेत. आता अजित पवार हेही भाजपसोबत आले. अजित पवार यांचं भाजप नेमकं काय करणार आहे. हे त्यांनी अजून मला काही सांगितलं नाही. त्यामुळे भाजपच्या ऑफरबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हंटलं.

परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात

भाजपची ऑफर असल्याचं राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमोर शेअर केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. दोन दिवसांपूर्वी काय बोलतो आणि दोन दिवसांनंतर काय होतं, हे काही नवीन नाही. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जात असल्याचं राज ठाकरे यांनी म्हंटलं. पण, महाराष्ट्राची प्रतारणा होणार नाही, याची काळजी आधी घेत होतो. यानंतरही घेतली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

मनसे भाजपसोबत का जाऊ शकते?

मनसेची मुंबई, पुणे आणि नाशिकच्या पलीकडे फारशी ताकद नाही. मनसेचा सध्या एकच आमदार आहे. १७ वर्षांत खासदारकीचं खातं उघडलं नाही. मनसेला भाजपची साथ मिळाल्यास मनसेला बुस्ट मिळू शकतो. मनसे भाजपसोबत आल्यास मिशन मुंबईचा भाजपचा मार्ग सोपा होईल. मनसेमुळे भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट ही महायुती आणखी भक्कम होईल. राज ठाकरेंबरोबर आल्यास उद्धव ठाकरेंविरोधातल्या लढाईला मदत होईल.

सुधीर मुनगंटीवार म्हणतात,…

यासंदर्भात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भाजपकडून राज ठाकरे यांना काय ऑफर होती मला माहीत नाही. कोअर टीममध्ये असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. पण, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी एकत्र येण्याबाबत चर्चा केली असेल तर याची माहिती माझ्याकडे नाही. राजकारणात कधी काय होईल आणि तेही महाराष्ट्रात याचा काही नेम नाही. भाजपच्या ऑफरवर राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे भाजपच्याच नाही, तर महाविकास आघाडीच्याही नजरा असतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.