विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले “सर्व पक्षांपेक्षा…”

राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढवणार याबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राज ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले सर्व पक्षांपेक्षा...
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 12:07 PM

Raj Thackeray on Maharashtra Assembly Election Seats : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. आज राज्यात मनसेच्या बैठकांचा धडाका पाहायला मिळणार आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत, असे विधान राज ठाकरे यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुका कशा पद्धतीने लढवणार याबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

जाहीरनामा लवकरच येणार

“मी माझ्या सभेत त्या दिवशी सांगितलं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नक्कीच सत्तेत असेल, हे मी फक्त कार्यकर्त्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. जाहीरनामा लवकरच येईल. त्यात काय असेल हे तेव्हाच समजेल”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

मी युती आघाडीबद्दल काहीही बोलणार नाही

यावेळी राज ठाकरेंना किती जागा लढवणार, युती किंवा आघाडीत जाणार का याबद्दलही विचारणा करण्यात आले. त्यावरही त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले. “सर्व राजकीय पक्षांपेक्षा सर्वात जास्तीत जास्त जागा आम्ही लढणार आहोत. किती काय हे तुम्हाला समजेल. लढवायच्या म्हणून लढवत नाही. २०१४ ला लढवल्या. २००९ लाही लढवल्या. मी युती आघाडी बद्दल आता काहीही बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो”, असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मनसेने काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी 1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर 2. पंढरपूर – दिलीप धोत्रे 3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे 4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे 5. चंद्रपूर – मनदीप रोडे 6. राजुरा – सचिन भोयर 7. वणी – राजू उंबरकर

Non Stop LIVE Update
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.