मुंबई : समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर बाण सोडला आहे. खारं पाणी गोड करण्याच्या प्रस्तावाला मनसेचा विरोध असल्याचं देशपांडे यांनी यावेळी सांगितलं. (MNS Sandeep deshpande Attacked Shivsena over Mumbai Salt Water Desalinated To prevent Storage)
समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचा आहे?, असा सवाल करत हा प्रस्ताव म्हणजे विरप्पन गँगचा नवा लुटीचा मार्ग असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
मुंबई शहरात मोठ्या पडलेल्या पावसाचं पाणी अडवण्याचा रेनवॉटर प्रकल्प बंद पडलेला असताना आता नवा विरप्पन गँगने लुटीचा नवा मार्ग शोधलाय. नव्या मार्गानुसार आता समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रस्ताव विरप्पन गँगने ठेवलाय. मात्र मनसेचा या प्रस्तावाला कडाडून विरोध असेल, असं देशपांडे यांनी सांगितलंय.
ज्या कंपणीला काम दिलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे, असं सांगत मुंबई महापालिकेत विरप्पन गँग फक्त लूट करत असल्याचा पुनरुच्चार करत येणाऱ्या काळात मुंबईकरांची ही लूट थांबवण्यासाठी मनसे विरप्पन गँगच्या विरोधात पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरणार असल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.
तुम्हीपण प्रकल्पाचा प्रहार थांबवा!! एकिकडे पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची.. दुसरीकडे दानव बनून त्याच मुंबईच्या समुद्राचे पाणी “गोडे” करुन पर्यावरणावर प्रहार करायचा.. हा बालहट्ट म्हणजे आपणच पायावर मारलेली कुऱ्हाड आहे… केवळ आमची बोलून मुंबई आपली होत नाही..त्यासाठी स्वार्थापोटी,मुंबईला न परवडणाऱ्या, खर्चीक, मच्छीमारांना उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाचा प्रहार थांबवावा लागेल. अन्यथा दरवर्षी समुद्र आणि पावसाचे रौद्ररूप पाहतोच… भविष्यात मोठे हाहाकार मुंबईला बघावे लागतील!
तुम्हीपण प्रकल्पाचा प्रहार थांबवा!!
एकिकडे पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारायच्या, मुंबईला लाखांची पोशिंदी म्हणायची.. दुसरीकडे दानव बनून त्याच मुंबईच्या समुद्राचे पाणी “गोडे” करुन पर्यावरणावर प्रहार करायचा.. हा बालहट्ट म्हणजे आपणच पायावर मारलेली कुऱ्हाड आहे…
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 10, 2021
मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी निर्णय घेतला आहे. यासाठी मनोरच्या समुद्राचे 200 एमएलडी खारं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणारे.
मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात (Water reduction) टाळण्यासाठी मनोर इथं समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी दिले आहेत.
‘महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोर येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोर येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणी पुरवठा होणार आहे.’
अनेक देशांमध्ये समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा प्रयोग यशस्वी झालाय. त्याचप्रमाणे काही देशांमध्ये या प्रकल्पांची उभारणी सुरुये. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले होते.
(MNS Sandeep deshpande Attacked Shivsena over Mumbai Salt Water Desalinated To prevent Storage)
हे ही वाचा :
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय