वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका, मनसेची मुख्यमंत्र्यांना विनंती

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला निर्बंध शिथिल करण्याची मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे. Sandeep Deshpande Uddhav Thackeray

वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका, मनसेची मुख्यमंत्र्यांना विनंती
संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 4:06 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एक विनंती केलीय. नागरिकांना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरला निर्बंध शिथिल करण्याची मागणी संदीप देशपांडेंनी केली आहे. “वर्षभर आम्ही तुमचं ऐकलं, एक दिवस आमचं ऐका ! नागरिकांना 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या !”, अशी विंनंतीचं संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ब्रिटनमध्ये नव्या रुपातील कोरोना आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केलीय. (MNS Sandeep Deshpande request to Uddhav Thackeray for new year celebration)

मुख्यमंत्र्यांना मनसेची विनंती

राज्य सरकारनं ब्रिटनमध्ये नव्या रुपातील कोरोना आढळल्यामुळे राज्यातील महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या निमित्तानं विविध ठिकाणी स्वागताच्या पार्ट्या होत असतात. त्यामुळं 31 डिसेंबरला एक दिवस लोकांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी मनसेच्या वतीनं सरचिटणीस संदीप देशपांडेंनी केली आहे

मुख्यमंत्री काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महापालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयवर मनसेने जोरदार टीका केली होती. मनसे नेते संदीप देशपांडेंनी नाईट कर्फ्यूचं कारण काय?,असा सवाल उपस्थित केला होता.”तुम्ही नाईट पार्ट्या करताय ते चालत , लोकांना बंधन का? , कोण कुठे पार्ट्या करत हे सर्वांना माहीत आहे”, अशी टीका केली होती. काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्वर ला जायला परवानगी कशी दिली?, त्यांच्यावर काय कारवाई झाली, असा सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केला होता.

कोरोनाची भीती दाखवता अमेरिकेसारखं पॅकेज द्या

संदीप देशपांडे यांनी या संपूर्ण वर्षात कोरोना विषाणूमुळे लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत. सरकार जर प्रत्येक वेळा कोरोनाची भीती दाखवत असेल तर अमेरिकेसारख पॅकेज द्यावं, अशी मागणी देशपांडेंनी केली होती.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला रात्रीचाच कोरोना असतो का? असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले होते.

संबंधित बातम्या:

Sandeep Deshpande | जनतेने काय सतत लॉकडाऊन मध्येच राहायचे का? संदीप देशपांडेंचा सवाल

Sandeep Deshpande | ‘मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का?’, संदीप देशपांडेंचा सवाल

(MNS Sandeep Deshpande request to Uddhav Thackeray for new year celebration)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.