मुंबई | मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता CCTV समोर आलंय. या सीसीटीव्हीत आरोपी कैद झालेत. तसंच पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलंय. मनसे नेते संदीप देशपांडेंवर हल्ला करणाऱ्यांचा व्हिडीओ समोर आलाय. बुधवारी, स्टम्प आणि रॉडने देशपांडे शिवाजी पार्कात हल्ला झाला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. मात्र CCTV कैद झालेत.
CCTVत दिसणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, अशोक खरात आणि किसन सोळंकी अशी त्यांनी नावं आहेत. CCTVत दिसणारा हाच अशोक खरात मुख्य आरोपी आहे. खरातवर याआधी मोक्काही लावण्यात आलाय. तसंच त्याच्यावर डोंबिवलीत हत्या आणि ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय की, खरातच्या हातात स्टम्प आहे. हा स्टम्प तो एका कार जवळ ठेवून पुढे निघतोय.
देशपांडेंनी पोलिसांच्या जबाबात, ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊतांचं नाव घेतलंय. याच अशोक खरातचे वरुण सरदेसाईंसोबतचे फोटोही व्हायरल झालेत. काही फोटो हे संजय राऊतांचे भाऊ, सुनिल राऊतांसोबतही आहेत. हेच फोटो देशपांडेंनीही पत्रकार परिषदेत दाखवले. कोरोनाच्या काळातील मुंबई महापालिकेतले घोटाळे बाहेर काढत असल्यानंच हल्ला झाल्याचा आरोपही, देशपांडेंचा आहे
आतापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, आता हल्ल्याचा तपास खंडणी विरोधी पथक करणार आहे. तर स्वत: संदीप देशपांडेंनी भांडुप कनेक्शन असल्याचं म्हटलंय. त्यामुळं भांडुप कनेक्शन म्हणजे कोण? अशी चर्चाही सुरु झालीय.
संदीप देशपांडेंचा रोख वरुण सरदेसाईंबरोबरच संजय राऊतांवर आहे. तर राऊतांनी हल्ला झाला की करवून घेतला म्हणत हल्ल्यावर शंका उपस्थित केलीय.
देशपांडेंवरील हल्ल्याचा तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे आलाय. त्यामुळं मास्टरमाईंड कोण? आणि हल्ल्याचा हेतू काय होता, हे उघडकीस आणण्याचं आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर असेल.