कौतुकास्पद! मनसेचा कोविड वॉर रुमद्वारे कोरोनाबाधितांना मदतीचा हात

मनसेने मुलुंड येधील नागरिकांसाठी 24 तास सेवा देणारे मनसे कोविड वॉर रूम उभारली आहे. MNS started covid war room

कौतुकास्पद! मनसेचा कोविड वॉर रुमद्वारे कोरोनाबाधितांना मदतीचा हात
Mulund MNS Covid War Room
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 12:19 PM

मुंबई: महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या नातेवाईकांना बेड, रुग्णवाहिका, औषधे आणि ऑक्सिजन मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.या साठी नेमकी कोणाला आणि कुठे विचारपूस करावी हे देखील लवकर समजत नाही. नागरिकांना उद्भवणाऱ्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. मनसेने मुलुंड येधील नागरिकांसाठी 24 तास सेवा देणारे मनसे कोविड वॉर रूम उभारली आहे. (MNS started covid war room at Mulund for help of Corona Patients)

बेड, ऑक्सिजन ते जेवणाची सोय करुन देणार

मुलुंडच्या केशव पाडामध्ये ही वॉररुम उभारण्यात आली आहे. या वॉररुमचे मोबाईल नंबर समाजमाध्यम आणि फ्लेक्स बोर्डद्वारे नागरिकांमध्ये पोहचविण्यात आले आहेत. या वॉररुम मधून रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन ची व्यवस्था करून देणे, औषधे कुठे मिळतील याची माहिती देणे गृह विलगीकरणामध्ये असलेल्या कुटुंबाना मोफत जेवणाची व्यवस्था करुन देणे, अशा विविध सोयी करून देण्यात येत आहेत.

पक्षीय मतभेद विसरु काम करण्याची गरज

सध्या पालिका , शासन चांगले काम करत आहे. मात्र, रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की सगळ्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून मदत करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही आता मुलुंडमधून हे वॉर रुम सुरु केले असून मुंबईत बऱ्याच ठिकाणी असे कक्ष उभारणार असल्याचे मनसेचे नेते शिरीष सावंत म्हणाले.

देशात 3 लाख 23 हजार नवे रुग्ण

भारताला कोरोना विषाणू संसर्गातून थोडा दिलासा मिळाला आहे.गेल्या 24 तासांमध्ये भारतात 3 लाख 23 हजार 144 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 771 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 2 लाख 51 हजार 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

मुंबईला दिलासा

राज्याची राजधानी मुंबईत वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होतेय. मुंबईत सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट झालीय. सोमवारी कोरोना रुग्णसंख्या 4 हजारांखाली गेलीय. मुंबईत 3792 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय.

महाराष्ट्रालाही दिलासा

राज्यात सोमवारी दिवसभरात 71,736 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज दिवसभरात 48,700 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 524 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा हस्तगत

Corona Vaccine | मुंबईत 18 वर्षांवरील व्यक्तींचे कोरोना लसीकरण लांबणीवर?

(MNS started covid war room at Mulund for help of Corona Patients)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.