MNS Vasant More : वसंत मोरेंनी शेअर केला राज ठाकरेंसोबतचा फोटो; म्हणाले, मी माझ्या साहेबांसोबत!
राज ठाकरेंसोबतची भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती.
मुंबई/पुणे : राज ठाकरेंसोबतची (Raj Thackeray) भेट यशस्वी झाली आहे. मी पूर्ण समाधानी होऊन जात आहे, असे वसंत मोरे (Vasant More) म्हणाले आहेत. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे नाराज झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर आज शीवतीर्थावर (Shivatheertha) राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलावले होते. ही भेट आणि चर्चा संपली असून मोरे समाधानी असल्याचे दिसत आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी आपल्याला बोलावल्याचे मोरे म्हणाले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे याच सभेत मिळतील, असे राज ठाकरे म्हटल्याचे मोरेंनी सांगितले. मी मनसेचा कार्यकर्ता असून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी मनसेतच राहणार, सगळ्या ऑफर्स संपल्या असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
भोंग्याच्या मुद्द्यावरून सुरू झाला होता वाद
राज ठाकरे यांनी ज्यावेळेपासून मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केले आहे, त्यावेळेपासूनच वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले. त्यांना त्या पदावरून हटवले गेले असल्यामुळे भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला बसणार याचे उत्तर आता येणारा काळच देणार आहे.
राज ठाकरेंसोबतचा फोटो शेअर
वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. मी माझ्या साहेबांसोबत सांगत सोशल मीडियावर फोटो टाकला आहे. या फोटोत नवनियुक्त पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबरही उपस्थित असल्याचे दिसत आहे. राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत वसंत मोरेंनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘मी मनसेतच’
वसंत मोरे यांच्या पक्षात येण्याने पालिका निवडणुकीत ताकद वाढणार आहे. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना आपल्या पक्षात खेचण्यास जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.