प्रकाश महाजन यांची ठाकरे कुटुंबावर जहरी टीका, सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांचं जशास तसं उत्तर
शिवसेनेतल्या बंडापासून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पण या वादात मनसेच्या नेत्यांनीही उडी घेतलीय.
मुंबई | मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किशोरी पेडणेकरांनी तर त्यापुढे जात महाजन कुटुंबातला कलहच बाहेर काढला.
“आता कोण यांना पळवून नेईल सांगा बरं आता. उद्या सुषमा अंधारे येते म्हणली तरी कोण घेऊन जाईल का ओ?”, असं मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.
“बंद पडलेल्या इंजिनाचे लोक बोलत राहतात आणि त्यांना राहून राहून एकच गोष्ट सुचते आणि ते काय म्हणतात”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“ते आमचे आदित्य ठाकरे..खरं म्हणजे मी बऱ्याच वेळेला म्हणलं बाबा..याचं वेळेवर लग्न लावायला पाहिजे. लग्न नाही केलं ना की माणसाची गडबड होते”, असं प्रकाश महाजन म्हणाले.
“दादा, तुमचा पक्ष एवढा बंद पडलाय का ओ. की आता तुम्ही वधू वर सूचक मंडळ काढणार आहात”, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला.
कोरोनाच्या काळात हे घरात बसले..बरोबर आहे ना..कोरोनाचा काळ आपल्या करीनासोबत हे घरातच बसले..ते बाहेर आलेच नाहीत”, असं म्हणत प्रकाश महाजन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर घसरले.
“तुमच्या घरामध्ये गोळीबार कशावरुन झाला भावावर हे आमच्यासारख्यांनी सांगण्याची गरज नाही”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
प्रकाश महाजन यांनी मनसेच्या घे भरारी अभियानात वादग्रस्त भाषण केलं. या भाषणातून त्यांनी टार्गेट केलं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला. पण हे करत असताना प्रकाश महाजन यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या. आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी विखारी टीका केलीच. पण रश्मी ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी करीना असा केला.
यांचा तो पाळलेला पत्रकार. त्यानं प्रश्न विचारला. तुमच्यासमोर काय समस्या उभा राहिल्या राज्य करताना. मुख्यमंत्र्यानं सांगितलं..मी आजारी पडलो. माझ्या मणक्याचं ऑपरेशऩ झालं. सुन्न पडलं .मला काळजी लागली. संदीप म्हणून गेला. कोरोनाच्या काळात घरी बसले. बरोबर आहे ना.कोरोनाच्या काळात आपल्या करीनासोबत घरात बसले”, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी हल्लाबोल केला.
“इतक्या घाणेरड्या शब्दात महाजन कुटुंबातला एक व्यक्ती बोलत असेल तर ते चांगलं नाही. कारण तुमच्या घरात गोळीबार कशावरुन झाला भावावर हे आमच्यासारख्यांनी सांगण्याची गरज नाही. लग्न झालेल्या बायकांवरुन होत असतील तर पहिलं घर सांभाळा म्हणावं. काय बोलता का. तुम्हाला काहीच बूज राहिली नाही.. जिभेला हाड नसतं ते खरं आहे. पण कुठल्या हाडावर उडतायत तेच कळत नाही”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरे लग्न करत नसल्याची बोचरी टीका केली. त्याला सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. “महाजनांनी वधू-वर सूचक मंडळ काढलंय का?” असा प्रतिसवाल अंधारेंनी विचारलाय..
प्रकाश महाजन काय म्हणाले होते?
“ते आमचे आदित्य ठाकरे. मी बऱ्याच वेळेला म्हणतो. याचं वेळेवर लग्न लावायला पाहिजे. लग्न नाही केलं ना. माणसाची गडबड होते. प्रत्येक सभेत म्हणतो 32 वर्षाचा झालो, 32 वर्षाचा झालो. आरं तू 32 वर्षाचा झाला. तुझ्या आईबापाला नाही ना वाटतं, त्याला आम्ही काय करावं. अजूनही लहान पोरासारखं तुला मध्ये घेऊन झोपत असतील..अजूनही आईबापाला सांगतो. 32 वर्षाचा झालो..माझं काहीतरी बघा. दिशा गेली पटन्याला. माहित नाही, पुन्हा आलीच नाही इकडं. मी म्हणले ठीक आहे. तुझे आईबाप नाही म्हणतायत. तर आमच्याकडे ये. चुलता लावून टाकेल लग्न. त्याच्यात काय. माणसाचं कसं आहे, चलबिचल होतं ना माणूस. नाहीतर मग काय करतं ते,कबड्डीत वाईड बॉल टाकतं” असं म्हणत प्रकाश महाजन यांनी आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं.
“भाजपनं अशा काही उपसुपाऱ्या दिल्या आहेत लोकांना.उपसुपाऱ्या दिलेल्या लोकांमध्ये बंद पडलेल्या इंजिनाचे लोकही बोलत राहतात. त्यांना राहून राहून एकच गोष्ट सूचते आणि ते काय म्हणतात.आदित्य ठाकरेंनी लग्न केलं नाही. राहुल गांधींची दाढी किती वाढलीय बघा. याचं काय झालंय. दादा तुमचा पक्ष एवढा बंद पडलाय का आता तुम्ही वधू वर सूचक मंडळ काढणार आहेत. सांगा तरी बाबा आता आमचा पक्ष कम्प्लिट बंद झालेला आहे. आता आम्ही वधू वर सूचक मंडळ काढलं आहे आणि वधू वर सूचक मंडळाचा संचालक म्हणून आम्ही प्रकाश महाजनची नेमणूक केलेली आहे. महाजन वधू वर मंडळ चालवणार आहे”, असा शब्दात सुषमा अंधारे यांनी प्रकाश महाजन यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं.
प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंवरही वादग्रस्त टिप्पणी केली होती. सुषमा अंधारेंना फक्त प्रकाश महाजनच प्रत्युत्तर देऊ शकतो असं सांगताना महाजनांनी मर्यादा ओलांडल्या होत्या.
“दसऱ्याचं भाषण झाल्यावर पत्रकाराचा फोन आला. आम्ही विचार करत बसलो. सुषमा अंधारेला तोंड कोण देऊ शकतो. ते म्हणले, प्रकाश महाजन तोंड देऊ शकतो. मी त्याला म्हटलं. आरे या वयात घरी तोंड देता देता बेजार. या बाईला कुठं तोंड देता. पुन्हा हिला पायाखाली स्टूल घ्यावा लागतो”, असं प्रकाश महाजन म्हणाले होते.
“मला ना त्या महाजन जे आहेत स्वताला तथाकथित बुद्धिमान. त्यांच्या घरातला पहिला जो राडा आहे. तो कशावरुन झाला. कोणावरुन झाला. आत्ता जे ते स्वर्गीय प्रमोद महाजन आमच्यासाठी तेव्हाही आदरणीय होते. आत्ताही आदरणीय आहेत. तू काका आहेस. काका मला वाचला म्हणणाऱ्या पुतण्याकडे जरा लक्ष दे म्हणावं”, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी महाजन यांना सुनावलं.
शिवसेनेतल्या बंडापासून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. पण या वादात मनसेच्या नेत्यांनीही उडी घेतलीय.
गजानन काळे, संदीप देशपांडे आणि प्रकाश महाजन यांच्या टार्गेटवर फक्त ठाकरे गटच असल्याचं दिसतंय. त्यामुळं सुषमा अंधारेंनी मनसेवर पुन्हा एकदा सुपारी घेतल्याचा आरोप केलाय.