मुंबईत धावणार आधुनिक वंदेभारत लोकल ट्रेन, 238 आधुनिक गाड्यांच्या खरेदीला मंजूरी

मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल वारंवार बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे इतर पार्ट नेहमीच बिघडत असतात. या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदेभारत एक्सप्रेस धावणार आहेत. 

मुंबईत धावणार आधुनिक वंदेभारत लोकल ट्रेन, 238 आधुनिक गाड्यांच्या खरेदीला मंजूरी
vande-bharat-expressImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 3:59 PM

मुंबई : मुंबईकरांना लक्झरीयस प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे बोर्डाने मुंबई उपनगरीय मार्गावर 238 वंदेभारत लोकल ट्रेनच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. या वंदेभारत लोकलचे टेंडर निघाल्यानंतर टप्प्या टप्प्याने मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई नागरी वाहतूक योजना ( एमयूटीपी ) – 3 आणि 3 ( अ ) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ यासंदर्भात टेंडर प्रक्रीया राबविणार आहे. मुंबई उपनगरी मार्गावर सध्या ‘भेल’ आणि ‘मेधा’ कंपनीच्या वातानुकूलित लोकल धावत असून त्यांची पुढील आवृत्ती म्हणून या आलिशान वंदेभारत मेट्रो धावणार असून मुंबईकरांचा प्रवासाचा अनुभव आमुलाग्र बदलणार आहे. मात्र या वंदेभारतचे तिकीटदर एसी लोकलप्रमाणेच जास्त असल्याने सर्वसामान्यांचा लोकल प्रवास महागण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी उपनगरीय मार्गावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भाजपा नेते राम नाईक यांच्या पुढाकाराने नव्वदच्या दशकात मुंबई रेल्वे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यातून राज्य आणि केंद्र याच्या पन्नास – पन्नास टक्के सहभागातून एमयूटीपी योजना राबविण्यात येत आहेत.

मुंबई उपनगराला एमयूटीपी-3 अंतर्गत 47 आणि 3 (अ) अंतर्गत 191 अशा 238 एसी लोकलसाठी मिळण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ ( एमआरव्हीसी ) 20 हजार कोटींची जागतिक निविदा काढणार होते. या एसी लोकल मेट्रोच्या धर्तीच्या असतील असे म्हटले जात होते. आता त्यांना वंदेभारतच्या धर्तीवर तयार केले जाणार आहे. त्यांच्या 35 वर्षांच्या देखभालीसह सर्व जबाबदारी कंपनीवरच सोपविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार दरम्यान एसी लोकलच्या 48 फेर्‍या चालवित आहे, तर मध्य रेल्वे 56 एसी लोकल चालवित आहे. या एसी लोकल वारंवार बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे इतर पार्ट नेहमीच बिघडत असतात. या एसी लोकलच्या जागी त्यांची पुढील आवृत्ती म्हणून वंदेभारत एक्सप्रेस धावणार आहेत.

वंदेभारतच्या देखभालीसाठी डेपोच्या उभारणीसाठी यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे. हे डेपो वंदेभारत तयार करणाऱ्या कंपन्यांच्या मदतीने बांधण्यात येणार आहेत. मेक इन इंडीया मोहीमेअंतर्गत या वंदेभारत ट्रेन आणि डेपो तयार करण्यात येतील. या वंदेभारत लोकल मेट्रोच्या धर्तीच्या असतील. त्यांना एकच गॅंगवे असेल. तसेच उपनगरीय गरजांनूसार त्यात बदल केलेला असेल. यामुळे प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल तसेच वाढत्या प्रवासी संख्येला या ट्रेन पुरक ठरतील असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी म्हटले आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.