Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Cabinet Reshuffle : दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, कसा आहे राजकीय प्रवास?

काही वेळापूर्वी जाहीर झालेल्या 43 जणांच्या यादीत भारती पवार यांचं नाव पाहायला मिळालं. याबाबत भारती पवार यांना विचारला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Modi Cabinet Reshuffle : दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, कसा आहे राजकीय प्रवास?
भारती पवार
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 7:15 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील 4 खासदारांना संधी देण्यात आलीय. त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार भारती पवार यांचाही समावेश करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे भारती पवार यांनी केंद्रीय मंत्रीपदासाठी अचानक नाव समोर आलं. त्यानंतर काही वेळापूर्वी जाहीर झालेल्या 43 जणांच्या यादीत भारती पवार यांचं नाव पाहायला मिळालं. याबाबत भारती पवार यांना विचारला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. (Dindori MP Bharti Pawar gets a place in the Union Cabinet)

नेमक्या कोण आहेत भारती पवार?

भारती पवार राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष होत्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं काम आहे स्वत: डॉक्टर असल्यानं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा. भारती पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांचं मोठं जाळं त्यांचा ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आणि कामं 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार असताना, लाखांच्या घरात मतं मिळवली . राष्ट्रवादीनं उमेदवार आयात केल्यानं ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्यानं दिंडोरीत ताकद वाढली. मुंबईत भाजप प्रवेशांनंतर भारती पवार यांनी पक्ष देईल ती जवाबदारी पार पाडू असं सांगितलं. भाजप महिलांचा योग्य सन्मान राखणारा पक्ष असल्याचं सूचक वक्तव्य भारती पवार यांनी केलं.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

भारती पवार यांनी 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्ती ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे भारती पवारांच्या निमित्तानं भाजपनं उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक मोठं घराणं गळाला लावल्याचं बोललं जात होतं.

भारती पवारांकडून पंतप्रधान मोदींचे आभार

भारती पवार यांनी शपथविधीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून आपल्याशी संवाद साधल्याचं सांगितलं. मोदी यांनी आपली आस्थेवाईकपणे चौकशी केल्याचंही त्या म्हणाल्या.  तसंच पवार यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Reshuffle: संभाव्य चर्चेला पूर्णविराम, महाराष्ट्रातून 4 नेते मंत्रीपदी, राणे, कराड, पवार, पाटलांना संधी, 43 मंत्र्यांची अधिकृत यादी एका क्लिकवर

Modi Cabinet Reshuffle: कोण मंत्री होणार यापेक्षा कोण घरी गेलं याचीच चर्चा जास्त; 12 मंत्र्यांना हटवलं

Dindori MP Bharti Pawar gets a place in the Union Cabinet

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.