मोदी सरकार म्हणजे पाकिटमार, लोकांचे खिसे कापतंय: नवाब मलिक
जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत | Petrol diesel nawab malik
मुंबई: पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे (Petrol and diesel rates) दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत, हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. (NCP leader Nawab Malik slams Modi govt over petrol diesel rates hike)
ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने लोकांची लूट थांबवावी. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असले पाहिजे, असेही मलिक यांनी म्हटले.
‘नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही’
देशात कोरोना संसर्गाचा हाहाकार उडाल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भाजपशासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करण्यात येत आहे. तेवढा पैसा कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता, असा टोला मलिक यांनी केंद्राला लगावला.
संबंधित बातम्या:
भारतात पेट्रोल शंभरी पार, मात्र ‘या’ देशात लिटरचा भाव अवघे दीड रुपये
(NCP leader Nawab Malik slams Modi govt over petrol diesel rates hike)