मोदीजींचं नाणं दाखवूनचं शिवसेना निवडून आली, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदीजींचं नाणं दाखवूनच शिवसेना निवडून आली.

मोदीजींचं नाणं दाखवूनचं शिवसेना निवडून आली, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं
Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 4:58 PM

मुंबई : नोटबंदीनंतर नरेंद्र मोदी हे घासलेलं, संपलेलं नाण झालंय, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. बाळासाहेबांसारखं खणखणीत नाणं आपल्याकडं आहे. फुटलेले खासदार म्हणाले होते, पुढच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या नावाचा वापर करावा लागेल. मग, आता तुम्हाला बाळासाहेबांच्या नावाचा वापर का करावा लागतो. आताची निवडणूक शेवटची निवडणूक (Election) आहे. हा निखाऱ्यावरचा प्रवास आहे. यात तुम्ही माझ्याबरोबर आहात. असं मत उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कान्फरन्सवर संवाद साधताना व्यक्त केलं. तसेच शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदीजींचं नाणं दाखवूनच शिवसेना निवडून आली. त्यामुळं बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील. देशामध्ये मोदीजींचं नाण चालतचं राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मागच्या वेळी मी म्हटलं प्रत्येक निवडणूक शेवटची समजूनच लढतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांना फार वाईट वाटलं होतं. त्यांनी माझी शेवटची निवडणूक असल्याचं म्हटलं होतं. माझा पक्ष आपलं काम करतो. देशात राज्यात आमचं सरकार आहे. जनतेची सेवा करणं आमचं काम आहे.

नाशिकची घटना दुर्दैवी आहे. अशा घटना घडणार नाही, यासाठी प्रयत्न करू.

भाजपचा विचार, आचार आतापर्यंत कार्यपद्धती, भविष्याचा विचार या सर्व पद्धतीची चर्चा अशा बैठकांमध्ये होते. मोदीजींनी गरिबांच्या कल्याणाचा अजेंडा राबविली. गरिबांना लोकशाहीशी जोडलं आहे. विकासाच्या तंत्राशी जोडलेलं आहे.

पुढच्या निवडणुकीचा रोड मॅप तयार केला. पदाधिकाऱ्यांना सर्वांगाण प्रशिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुसाठी पदाधिकाऱ्यांना तयार केलं जातंय. त्यासाठी भाजप बैठकांचं आयोजन करतं.

निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. जेव्हा वाद निर्माण होतात, तेव्हा निवडणूक आयोग अशाप्रकारचा निर्णय घेते. यापूर्वी असं झालेलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.