दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल
सह्याद्री अतिथीगृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या साथीरासोबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त मिटिंग झाली होती. देशमुख दाऊदच्या साथीदारासोबत काय करत होते? (Mohit Kamboj alleges that anil deshmukh met dawood's man)
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या साथीरासोबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त मिटिंग झाली होती. देशमुख दाऊदच्या साथीदारासोबत काय करत होते? या दोघांमध्ये कोणती डिलिंग सुरू होती? असा सवाल भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सनसनाटी आरोप केला. कोरोनाच्या काळता दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सह्याद्रीवर गेला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत त्याची गुप्त मिटिंगही झाली होती. या बैठकीला राज्याच्या एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होता. तसेच सुनील पाटीलही यावेळी हजर होते, असं फोटो काढणाऱ्याचं म्हणणं आहे. तसेच ड्रग्ज पेडलरांना संरक्षण देण्यासाठी किती हप्ता घ्यायचा याची डिलिंग सह्याद्रीवर चालू होती, असंही फोटो काढणाऱ्याचं म्हणणं असल्याचा दावा कंबोज यांनी केला.
सुनील पाटीलशी राष्ट्रवादीचा संबंध काय?
गृहमंत्री ज्या व्यक्तीला भेटणार असतात त्या व्यक्तीची सर्व माहिती गृहमंत्र्यांना पोलीस विभागाकडून दिली जाते. तरीही देशमुख या चिंकू पठाणला भेटले. त्यामुळे त्यांचे आणि या ड्रग्ज पेडलरशी काय संबंध आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज पेडलरांची पाठराखण करत आहेत का? सुनील पाटील यांचा या संपूर्ण प्रकरणाशी आणि राष्ट्रवादीचा काय संबंध आहे? याची उत्तरे राष्ट्रवादीने दिली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
एनआयएमार्फत चौकशी करा
हॉटेल ललितमध्ये सुनील पाटील यांच्या नावाने 8 महिन्यापेक्षा जास्त काळ रुम बुक होती. त्या ठिकाणी ऋषिकेश देशमुख त्यांना भेटायला जायचे. ऋषिकेश देशमुख त्यांना भेटायला का जायचे? सुनील पाटील इतका काळ या हॉटेलात काय करत होते? पाटील यांचे नवाब मलिकांशी काय संबंध आहेत? याची केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएमार्फत चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नवाब मलिक यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भानुशाली, सॅम आणि साईल हे पाटलांचे साथीदार
मनीष भानुशाली, सॅम डिसूझा आणि प्रभाकर साईल हे सुनील पाटील यांचे साथीदार आहेत. शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात कोणत्या नेत्यांचा सहभाग होता याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
BIGGEST EXPOSE in the history of Maharashtra in this Press Conference प्रेस वार्ता: महाराष्ट्र के इतिहास का सबसे बड़ा खुलासा https://t.co/avVBCnutBn
— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) November 6, 2021
संबंधित बातम्या:
आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर
कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार
(Mohit Kamboj alleges that anil deshmukh met dawood’s man)