ठाकरेंनी आधी स्वतःचं घर सांभाळावं, मोहित कंबोजांनी ‘ही’ शक्यताही सांगितली…
संजय राऊत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त नकारात्मक बोलायचं, टीका करायची एवढचं त्यांना जमलं आहे.
मुंबईः कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटावर ज्याप्रमाणे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाकडून गुवाहाटीतून निशाणा साधण्यात येत आहे. देवीचे दर्शन, हात दाखवून भविष्य बघण्यावरून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते मोहित कंबोज हेही शिंदे गटाबरोबर गुवाहाटीला रवाना गेल्यानंतर त्यांच्याकडून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
मोहित कंबोज यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना म्हटले आहे की, ज्यांना स्वतःच्या पक्षामध्ये काय चालले आहे, ते माहिती नाही.
आणि ते दुसऱ्यावर टीका काय करणार. ज्यांना आपल्या गटातील राहिलेलेल आमदारही कधी सोडून जातील हे माहिती नाही. त्यामुळे त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.
मोहित कंबोज यांनी ज्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यानी निशाणा साधला आहे.
गेल्या दोन तीन महिन्यापासून ते ज्या जेलयात्रेवर होते. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सध्या त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांना बोलू द्या अशा शब्दात त्यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली आहे.
संजय राऊत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त नकारात्मक बोलायचं, टीका करायची एवढचं त्यांना जमलं आहे.
जेलमधून बाहेर आल्यावर त्यांची मानसिक अवस्था बिघडली आहे. त्यामुळे ते काहीही टीका करत आहेत. मानसिक अवस्था चांगली नसल्यामुळे ते सध्या काय बोलतात ते बोलू द्या असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
मोहित कंबोज यांनीही ठाकरे गटावर निशाणा साधल्यामुळे आता ठाकरे गट आणि मोहित कंबोज हा पेटणार की काय असा सवाल आता राजकीय वर्तुळातून केला जात आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या प्रतिक्रियेवर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात त्याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे.