Hanuman Jayanti: हनुमान जयंतीनिमित्त 1 हजार लाऊडस्पीकर देशभरातील मंदिरांना देणार- मोहित कंबोज
Mohit Kamboj on Loudspeakers: हनुमान जयंतीनिमित्त तब्बल एक हजार लाऊडस्पीकर (Speakers) मंदिरांना देण्यता येणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी रितसर अर्जही मागवले आहेत.
मुंबई : एकीकडे राज्यात मशिदींवरीन भोंगे विरुद्ध मनसेची हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) असा वाद रंगलेला आहे. तर दुसकीकडे भाजप नेते मोहित कंबोज (Bjp Leader Mohit Kamboj) यांनी तब्बल एक हजार लाऊडस्पीकर मंदिरांना देण्याचं जाहीर केलंय. त्यासाठी त्यांनी अर्जही मागवले आहेत. हनुमान जयंतीनिमित्त तब्बल एक हजार लाऊडस्पीकर (Speakers) मंदिरांना देण्यता येणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. त्यासाठी त्यांनी रितसर अर्जही मागवले आहेत. अर्जांची पडताळणी करुन लाऊडस्पीकर दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंदिरांपेक्षा जास्त लाऊडस्पीकर हे मशिंदीवर लावले गेले असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. सुप्रीम कोर्टाचे आदेश न मानता लाऊडस्पीकर लावले गेले असल्याचाही आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आणला होता.
मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्षेत नोंदवण्यालनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थनही केलं होतं. मोहित कंबोजही त्यापैकीच एक होते. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याबाबत अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, मोहित कंबोज यांनी चक्क मंदिरांना लाऊडस्पीकर देण्याचीच घोषणा दिली आहे.
हनुमान जयंतीचं निमित्त…
हनुमान जयंतीचं निमित्त साधून या लाऊडस्पीकरचं वाटप करण्यात येणार आहे. मोहित कंबोज यांनी म्हटलंय, की
कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला त्याची प्रार्थना करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्या प्रार्थनेच्या आम्ही विरोधात नाही. मात्र सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून मशिदींवरील एक किलोमीटरच्या अंतरावर भोंगे लावण्यात आलेले आहेत. त्या भोंग्यावर आमचा आक्षेप आहे, असंही मोहित कंबोज यांनी म्हटलंय.
आज से LoudSpeaker बताना चालू किया !
श्री घंटेश्वर हनुमान मंदिर 11वां रास्ता, मधु पार्क, खार (पश्चिम), मुंबई में पहला Loud Speaker दिया !
बोलो सियावर रामचंद्र की जय….
बाक़ी मंदिरों को ? 16 April हनुमान जयंती से भेजना चालू होगा !
जय श्री राम – जय श्री राम pic.twitter.com/Ssv5ppkYVk
— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 14, 2022
मुख्यमंत्र्यांना कंबोज यांचा सवाल
दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी सरकारलाही जाब विचारलाय. सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावून लावण्यात आलेल्या भोंग्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत? शिवसेना गप्प का आहे? सत्तेच्या लाचारीसाठी तुम्ही महाआरतीच्या विरोधात जाणार आहात का? असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केलाय.
संबंधित बातम्या :
आम्ही Raj Thackeray यांच्या पाठीशी – Mohit Kamboj
तलवार दाखवल्यानंतर माझ्यावर गुन्हा, आता काँग्रेस नेत्यांवर तीच कारवाई करा, मोहीत कंबोज यांची मागणी