Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना कोर्टाचा दिलासा तर पालिकेला दणका, नोटीसा दिलेल्या कारवाई थांबवण्याचे आदेश
भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई सत्र न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांच्या खार स्थित निवासस्थाने केलेल्या अवैध बांधकाम संदर्भात मुंबई महानगरपालिकाने जी नोटीस पाठवली होती, त्या नोटीसीला सत्र न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे .
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे नाव चागलेच चर्चेत आहे. मोहित कंबोज हे नाव काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही (Devendra Fadnavis) जोडलं. तर मोहित कंबोज हेही महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊत आणि नवाब मलिक यांचा उल्लेख ते सतत सलीम जावेदची जोडी म्हणून करतात. मात्र याच मोहित कंबोज यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांत मुंबईत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. आता मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई सत्र न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांच्या खार स्थित निवासस्थाने केलेल्या अवैध बांधकाम संदर्भात मुंबई महानगरपालिकाने जी नोटीस पाठवली होती, त्या नोटीसीला सत्र न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे .
मोहित कंबोज यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
कितने भी तू करले सितम हंस हंस के सहेंगे हम यह जंग नहीं होगी खतम सनम मेरे सनम ! मैं डरने वाला नहीं हूँ ! pic.twitter.com/nEcGKalS0C
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 15, 2022