संजय राऊतांचा स्मगलरशी संबंध काय?, मोहित कंबोज यांचे राऊतांना चार सवाल
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर मोहित कंबोज यांनी त्याला पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे स्मगरलशी संबंध काय? असा सवाल करत कंबोज यांनी राऊत यांना चार सवाल केले आहेत.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर मोहित कंबोज यांनी त्याला पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे स्मगरलशी संबंध काय? असा सवाल करत कंबोज यांनी राऊत यांना चार सवाल केले आहेत. राऊतांनी इकडचे तिकडचे आरोप करण्यापेक्षा जम्बो कोव्हिड घोटाळ्यातील प्रश्नावर उत्तरे द्यावीत. तसेच प्रवीण राऊत (pravin raut) यांनी ईडीला जी माहिती दिली आहे, त्यावर राऊतांनी भाष्य करावं, असं आव्हानच कंबोज यांनी केलं आहे. तसेच मै झुकुंगा नही, असं सांगत आपली बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब टाकल्यानंतर मोहित कंबोज यांनीही तात्काळ पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे.
मोहित कंबोज यांनी यावेळी संजय राऊत आणि त्यांचा एकत्रित फोटो दाखवला. राऊत दरवर्षी माझ्या घरी गणपतीला येत असतात. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. एवढेच नाही तर त्यांना जेव्हाही आर्थिक मदतीची गरज पडली. तेव्हा मी त्यांना मैत्रीत मदतही केली आहे. पण आता त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला आहे. त्यामुळे ते विसरत आहे, असा हल्ला मोहित कंबोज यांनी चढवला.
हे तर माझं सौभाग्य
राऊत यांनी कंबोज यांना फडणवीसांचा ब्लू आईज बॉय म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला त्यांनी फडणवीसांचा ब्ल्यू आईज बॉय म्हटलं त्याचा मला अभिमानच आहे. फडणवीसांचा प्यून जरी म्हटलं असंत तरी ते माझं सौभाग्य असतं. माझी लॉयलटी पार्टीशी आहे. फडणवीसांशी आहे. पण तुम्ही कुणाचे ब्लूआईज बॉय आहात? ठाकरेंची की पवारांचे? तुम्ही कुणाला लॉयल आहात?, असा खोचक सवालच त्यांनी केला. तुमचे प्रवीण राऊतांशी संबंध उघड झाले, भ्रष्टाचार उघड झाला. म्हणून तुम्ही फ्लॉपशो केला. आम्हाला घामटा फुटेल असं तुम्ही म्हणाला. पण तुम्हालाच घामटा फुटला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
1) शासन प्रशासन तुमच्याकडे आहे. राकेश वधावनकडून 12 हजार कोटीची जमीन मी 100 कोटीला खरेदी केली. म्हणजे एवढी स्वस्त जमीन जगात तरी कुठे मिळते. दहा लाख स्क्वेअर फुटाची जमीन जगात कुठे असते का? राऊतांनी उत्तर द्यावं.
2) म्हाडाची जमीन गुरु आशिषकडून आमच्या कंपनीने खरेदी केली. त्यात माझे पैसे बुडाले. त्याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्याने राकेश वाधवन आणि संबंधितांना रिडेव्हल्पमेंटसाठी जमीन दिली होती. फडणवीसांनीच या वाधवानवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचे आम्ही तक्रारदार आहोत.
३) प्रवीण राऊत यांची डीडीपीएल ग्लोबल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नायगाव, वसई, विरारमध्ये आहे. प्रवीण राऊतांच्या फ्रंटमॅनने एका माणसाची खोटी पॉवर अॅटर्नी करून मुंबईतील एका बिल्डरला येथील जमीन विकली. त्याची चौकशी झाली. आता हीच माहिती मी ईओडब्ल्यूला देईल. या सेटलमेंटच्या बैठकीला संजय राऊत होते. पाच हजार कोटीचा प्रोजेक्ट. 1500 कोटीला जमीन विकली. साडेसातशे कोटी प्रवीण राऊतला मिळाले. संजय राऊतांना किती कट मिळाले?
4) तुमचा आणि ग्रँड हयातचा संबंध काय? राजकुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी वंदना गुप्ता यांच्यावर डीआरआयचा एफआयआर आहे. गुप्तावर स्मगलिंग रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. त्यांच्याशी संजय राऊतांचा काय संबंध आहे? त्यांची दलाली करण्यासाठी त्यांचा काय कट आहे?
संबंधित बातम्या: