तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण; तानाजी सावंतांच्या समर्थनात उद्या भूमममध्ये मोर्चा
सामूहिक विवाह सोहळे, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करीत आधार दिला आहे. अनेक मुलांना शिक्षण व नोकरीची संघी दिली आहे. यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने सामाजिक मदत करण्याच्या भूमिकेतून करण्यात आली आहेत.
उस्मानाबादः शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. तानाजी सावंत (Rebel MLA Dr. Tanaji Sawant) यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक आता एकवटले आहेत. उद्या 27 जून रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मोर्चाचे (Monday Morcha) आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबतचा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले आहेत. आमदार सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी यांचे स्वकीयसह विरोधक असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने कसे खच्चीकरण केले याचा पाढा उद्या सभेत मांडला जाणार आहे.
डॉ तानाजी सावंत यांनी भूम, परंडा, वाशीसह उस्मानाबाद यवतमाळ मतदार संघात कोट्यवधी रुपये खर्च करुन शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली.
शेतकरी कुटुंबाचे पालकत्व
सामूहिक विवाह सोहळे, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करीत आधार दिला आहे. अनेक मुलांना शिक्षण व नोकरीची संघी दिली आहे. यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने सामाजिक मदत करण्याच्या भूमिकेतून करण्यात आली आहेत.
जाणीवपूर्वक कामे नामंजूर
उस्मानाबादच्या पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसैनिक यांच्यासह पदाधिकारी यांच्याकडून विकास कामे मंजूर करुन देण्यासाठी 10 टक्के अशी टक्केवारी घेतली आहे. अनेक तालुक्यातील कामे जाणीवपूर्वक नामंजूर करण्यात आली. गडाख हे अपक्ष निवडून आले असताना त्यांना शिवसेनाच्या कोट्यातून पक्ष प्रवेश न करता थेट रातोरात कॅबिनेट मंत्री केले तसेच उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून लादले, गडाख हे केवळ झेंडा फडकवायला उस्मानाबाद येथे आले त्यांनी शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम केले नाही उलट गटबाजी वाढविली असल्याची टीकाही करण्यात आली आहे.
विचार पटणाऱ्या शिवसैनिकांचा उद्या मोर्चा
राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जाणीवपूर्वक डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळू दिले नाही. परंडा मतदार संघातील अनेक कामे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी होऊ दिली नाहीत तर कामामध्ये खोडा घातला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून काम करणाऱ्या शिवसैनिक यांच्यावर आजवर अन्याय का झाला आहे. यासह अन्य बाबींचा विचार करणे गरजेचे आहे त्यामुळे समर्थक व विचार पटणाऱ्या शिवसैनिकांनी उद्या समर्थन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, भूमचे नेते संजय नाना गाढवे, शिवसेनेचे जिल्हा समन्व्यक तथा माजी सभापती दत्ता साळुंके, उपजिल्हा प्रमुख दत्ता मोहिते, परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव, वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवासेनेचे परंडा तालुका प्रमुख राहुल डोके, भूम तालुका प्रमुख निलेश चव्हाण, वाशी तालुका प्रमुख बालाजी लाखे, परंडा शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड, ज्येष्ठ नेते सुभाषसिंह सिद्धिवाल, अण्णासाहेब देशमुख, शिवाजी भोईटे, विकासरत्न डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांनी केले आहे.