Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला शिवी देता येत नाही, नाही तर ही…”; ठाकरे गटाच्या नेत्यानं गद्दार म्हणत शिवसेनेवर सडकून टीका

खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाला दळभद्री म्हणत त्यांनी इलेक्शन कमिशनला सवाल उपस्थित केले आहेत.

मला शिवी देता येत नाही, नाही तर ही...; ठाकरे गटाच्या नेत्यानं गद्दार म्हणत शिवसेनेवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 7:00 PM

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण वेगवेगळ्या घटनांनी राज्य ढवळून निघाले आहे. त्यानंतर आज शिवगर्जना कार्यक्रम झाला त्यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार तोफ डागली.

एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका करताना अरविंद सावंत यांनी आमदार भास्करराव जाधव यांना उद्देश्यून म्हणाले की, भास्करराव जाधव तुम्ही त्यांनी गद्दारी केली हे खरं असलं तरी ती गद्दारी त्यांनी का केली हे ही तुम्ही सांगितले पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नाही तर ते पहिल्यां ईडीला घाबरून गेले हे आधी तुम्ही सांगितले पाहिजे असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

मी त्यांना शिवी दिली असती मात्र आता व्यासपीठावरून त्यांना शिवी देता येत नाही म्हणून ही बंडखोरी नाही तर ती दोन फुल्यांची बंडखोरी असल्याचा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

बंडखोरी आणि गद्दारीचा विषय निघाल्यावर अरविंद सावंत यांनी परमार यांचा विषय काढत त्यांच्या डायरी उघडा बरं, त्यामध्ये पहिलं नाव कुणाचं येतं असं नागरिकांना विचारल्यानंतर त्यावेळी लोकांनीही एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर ते म्हणाले एवढं कळल मग हे पुरे आहे असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला लगावला आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाला दळभद्री म्हणत त्यांनी इलेक्शन कमिशनला सवाल उपस्थित केले आहेत.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून तुम्ही 40 आमदारांचे मत विचारात घेता मग ज्या 140 जागांवर आम्ही निवडणूक लढवली ती मतं कुणाची आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आज जरी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला असला तरी, तो निर्णय आम्हाला मान्य नाही. जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे, त्या कार्यक्रमाची स्क्रीप्ट ही भाजपच्या कार्यालयात लिहिली गेली आहे असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?.
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.