“चिखलात रुतलेला माणूस हालचाल करतो, तेव्हा तो अजून चिखलात जातो”;शेवाळेंच्या आरोपांना ‘या’ खासदारनं दिलं जशास तसं उत्तर

राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले होते. राहुल शेवाळे एवढ्यावरच हे थांबले नाहीत.

चिखलात रुतलेला माणूस हालचाल करतो, तेव्हा तो अजून चिखलात जातो;शेवाळेंच्या आरोपांना 'या' खासदारनं दिलं जशास तसं उत्तर
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 6:26 PM

मुंबईः हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांकडून सीमाप्रश्नीवरून विरोधकांना घेरणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यारून अनेकदा गदारोळही झाला. मात्र शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृ्त्यूप्रकरणी गंभीर आणि जोरदार आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनावरही पडताना दिसून आले. राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडूनही दिशा सालिया प्रकरणाची उच्च स्तरावरून चौकशी करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणावरून राजकारण प्रचंड तापले होते. त्यामुळे आता ठाकरे गटाने खासदार राहुल शेवाळे यांच्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हणाले की, राहुल शेवाळे यांचे आरोप म्हणजे बुडत्याचे पाय खोलात.

चिखलात रुतलेला माणूस हालचाल करतो, तेव्हा तो अजून चिखलात जातो असा टोलाही अरविंद सावंत यांनी त्यांना लगावला आहे.

राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केले होते. राहुल शेवाळे एवढ्यावरच हे थांबले नाहीत.

तर त्यांनी आदित्य ठाकरे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही केली. त्यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार करत आदित्य ठाकरे म्हणजे राजकारणातील खणखणती सोनं आहे असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे भाजप आणि त्यांच्या नेत्यांचे मनोबल ढासळू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर वाटेल ते आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका करताना राहुल शेवाळे यांचेच पाय चिखलात रुतले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे असंही त्यांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.