संजय राऊतांवरी कारवाई चुकीची, शिंदे गटातील नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर…

संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत संजय राऊत यांची पाठराखण गजानन कीर्तीकर यांनी केली असल्याचे दिसून आले.

संजय राऊतांवरी कारवाई चुकीची, शिंदे गटातील नेत्याचा राज्य सरकारला घरचा आहेर...
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 8:14 PM

मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटांकडून सवाल प्रतिसवाल करण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही सूड बु्द्धीने करण्यात आली होती. असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाने शिंदे गटावर केला होता. ठाकरे गटाचीच री ओढत नुकताच शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तीकर यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

त्यांच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचे सांगत संजय राऊत पाठराखण गजानन कीर्तीकर यांनी केली असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांची पाठराखण केल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याचेही सांगण्यात येत आहे.

नुकतेच शिंदे गटात सामील झालेले अगोदर ठाकरे गटाचे नेते आणि आता शिंदे गटाचे झालेले गजानन कीर्तीकर यांनी संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची पाठराखण केली आहे.

त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर गजानन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा किरकोळ होता असं स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाने समर्थन केले असले तरी शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकाराचे आरोप केले होते.

त्यावरही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत यावर सध्या काही बोलणार नाही असं स्पष्ट सांगितले होते. मात्र शिंदे गटात गेलेल्या गजानन कीर्तीकर यांनी मात्र न्यायालयाने जे म्हटलं आहे तेच बरोबर आहे असं म्हणत त्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.