मार्च महिन्यात महाराष्ट्रात 55,000 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग : खासदार मनोज कोटक
दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये लहान आणि तरुण मुलांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. म्हणून या बाबत राज्य सरकारने वेगळी मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशी मागणी भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केली.
मुंबई : “महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये लहान आणि तरुण मुलांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. म्हणून या बाबत राज्य सरकारने वेगळी मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशी मागणी भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केली. मार्च माहिन्यात राज्यात जवळ जवळ 55,000 पेक्षा जास्त कोरोना बाधित मुले आढळून आले आहेत. यात 0 ते 10 वर्षे वयोगटातील 15,500 मुले आणि 11 ते 20 वर्षे वयोगटातील 40,000 तरुण मुलांचा समावेश होता, असंही यावेळी त्यांनी नमूद केलंय (MP Manoj Kotak demand special guidelines amid increasing corona infection in Childs).
मार्च मध्ये एकंदर बाधितांमध्ये 21 ते 30 ते वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 17 टक्के
मनोज कोटक म्हणाले, “वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यामध्ये राज्यातील 6 लाखापेक्षा जास्त बाधितांमध्ये मुले आणि तरुणांचे प्रमाण जवळपास 55,000 पेक्षा जास्त आहे. मार्च मध्ये एकंदर बाधितांमध्ये 21 ते 30 ते वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 17 टक्के, 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 22 टक्के तर 41 ते 50 वयोगट 18 टक्के होते.”
Corona hitting children below 10 yrs and 11-20 bracket of age in a large number is a serious concern. With disturbing increase in number of cases in Maharashtra, the government should formulate new norms and methodology.
Do not let your guards off. Please stay safe. pic.twitter.com/qk3BQYHIwC
— Manoj Kotak (@manoj_kotak) April 1, 2021
गेल्या वर्षी 0-10 वयोगटातील 87,000 तर 10-20 गटातील 1.82 लाख मुलांना कोरोनाचा फटका
“या वर्षी 0-10 वयोगटात जानेवारीमध्ये 2000, फेब्रुवारीमध्ये 2700 आणि मार्चमध्ये 15,500 अशी रुग्ण संख्येत वाढ होत गेली. 10-20 वयोगटात हे प्रमाण जानेवारीत 5300, फेब्रुवारीत 8000 आणि मार्चमध्ये 40,000 असे होते. गेल्या वर्षी 0-10 वयोगटातील 87,000 तर 10-20 गटातील 1.82 लाख मुलांना कोरोनाचा फटका बसला. बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात मुलांचा समावेश असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मृतांच्या संख्येत मुलांचे प्रमाण जास्त नाही,” अशीही माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा :
‘OTT प्लॅटफॉर्मवर सेक्स, हिंसा आणि द्वेष’, भाजप खासदाराची सेंसरशीपची मागणी
‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप
मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी
व्हिडीओ पाहा :
MP Manoj Kotak demand special guidelines amid increasing corona infection in Childs