आदित्य ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं केलं जातय; रिया चक्रवर्ती प्रकरणावरून राजकारण तापलं…
ज्यांची निष्ठाच स्वत:च्या घरात नाही ते आरोप करत आहेत असा पलटवारही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्यासाठी विरोध आक्रमक झाले असून त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा शेवाळेंचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबईः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून अवघे तीन दिवस झाले असतानाच वेगवेगळ्या मुद्यांनी ते गाजत आहे. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे प्रकरण प्रचंड तापले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा करण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 फोन आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
त्यामुळे शिंदे गटाने आता सुशांतसिंग राजपुत प्रकरणाचा सीबीआयचा तपास, कुठपर्यंत आला आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर AU नावाने नेमके फोन कुणाचे आले आहेत असाही त्यांनी सवाल केला आहे.
मुंबई पोलिसांच्या तपास AUचा उल्लेख अनन्या उधास आहे. तर बिहार पोलिसांच्या तपासात AU चा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.सुशां
तच्या आत्महत्येवरुन राहुल शेवाळे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्याकडेच बोट दाखवले आहे, पण लव्ह यू मोअर म्हणत आदित्य ठाकरे यानी उत्तर दिलं आहे.
ज्यांची निष्ठाच स्वत:च्या घरात नाही ते आरोप करत आहेत असा पलटवारही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजीनाम्यासाठी विरोध आक्रमक झाले असून त्यावरुन लक्ष विचलित करण्याचा शेवाळेंचा प्रयत्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रात याआधीही राजकारण तापले आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयने तपास केला आहे.
अजून सीबीआयने अंतिम निष्कर्ष सांगितलेला नाही. पण मुंबई पोलिसांकडून AU चा उल्लेख अनन्या उधास आणि बिहार पोलिसांकडून AUचा आदित्य उद्धव असा उल्लेख केला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळं नेमका AU कोण ? असा सवाल राहुल शेवाळे यांनी केला आहे.
सुशांतच्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची हिचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यावेळी रियाकडून सांगण्यात आलं होतं की, AU म्हणजे अनन्या उधास असून अनन्या ही तिची मैत्रीण आहे.
विशेष म्हणजे याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांनी सुशांतच्या आत्महत्येवरुन आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. नारायण राणेंनी तर वारंवार त्यांना जेलचा इशाराही दिला होता, तर ऐन हिवाळी अधिवेशनात आता सत्ताधाऱ्यांना हे आयते कोलीत मिळाले असल्याचा सांगण्यात आले आहे.