‘सीमावाद’ आता राष्ट्रपतींकडे…; शिंदे गटाच्या नेत्याने पत्रातून केली ही मागणी
कन्नडिगांच्या ठोशास ठोसा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या वादावर आता राष्ट्रपतींना विनंती करण्यात आली आहे.
मुंबईः सीमाप्रश्नावरून होणारे वाद तात्काळ थांबवून त्या प्रश्नी आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. सीमावाद राष्ट्रपती यांनी सोडवण्याबाबत खासदार शेवाळे यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीमावाद चिघळला असून त्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांसह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि पंढरपूर दावा सांगितला.
त्यानंतर सीमावादावर ठिणगी पडली. त्यानंतर महाराष्ट्रातील वाहने कर्नाटकमध्ये गेल्यानंतर एमएच पासिंग असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
तर कन्नडिगांच्या ठोशास ठोसा देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे या वादावर आता राष्ट्रपतींना विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यानंतर आता बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर हा वाद विकोपालाही गेला होता.
तर महाराष्ट्रातील काही गावांनीही कर्नाटकात जाण्याचा इशारा आणि ठराव केल्यानंतर या वादाला वेगळे वळण लागले. त्याचमुळे आता खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून हा वाद सोडवण्याची मागणी केली आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आता राष्ट्रपतींना पत्र लिहून सीमावाद सोडवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती मूर्मू या सीमावादाविषयी काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रतील गावांवर दावा केल्यानंतर ही वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती याबाबत काय निर्णय घेतात आणि राहुल शेवाळे यांच्या पत्राला त्या कधी आणि काय उत्तर देतात हे महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.