नव्या विस्तारात शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, अमित शाह यांच्या सूचना; संजय राऊत यांचा मोठा दावा

बजरंग बलीच्या नावाने कर्नाटकात दंगली घडवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात देखील हे प्रयोग अनेक वेळा झाले ते यशस्वी झाले नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

नव्या विस्तारात शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, अमित शाह यांच्या सूचना; संजय राऊत यांचा मोठा दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 2:30 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ झाला तर मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना अमित शाह यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे. अमित शाह यांनी या मंत्र्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ते मीडियाशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुटुंबासह गेले असतील. तिकडे बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे, डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्फोट होणार आहेत. अमित शाह यांनी त्यांना विस्ताराबाबत आदेश दिले आहेत. काही मंत्र्यांना वगळण्याचे हे आदेश आहेत. ते ओझं घेऊन मुख्यमंत्री कश्मीरला गेले असतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

हे सुद्धा वाचा

दंगलीमागे राजकीय हात

कोल्हापूर येथील दंगलीवरूनही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. गेल्या दहा वर्षात दंगली मागे राजकारण असतं आणि राजकीय हात आहे. देशातील राजकारणाला चटक लागली आहे. ज्यांना धर्मांतेचं राजकारण करायचं आहे. त्यांना चटक लागली आहे. राजकारणाचा शॉर्टकट मार्ग निवडतात. दंगली घडवतात आणि हिंदू मुसलमान किंवा अन्य धर्मात भेदाभेद करून मग निवडणुकीला सामोरे जातात. राज्यात आजही भाजप महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. मुंबई, पुणे नागपूर, ठाण्यासारखी शहरे ही महापौरांशिवाय आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून एकतर्फी राज्यकारभार सुरू आहे. लोक काय निर्णय देतील याची खात्री नाही. त्यामुळे धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे, असं राऊत म्हणाले.

उद्योग गुजरातला नेण्याचं कारस्थान

तुमचं हिंदुत्व एवढं कच्चं आहे का? तुमचं हिंदुत्व तकलादू पायावर आहे का? कुठल्या तरी मोगल राजाचे फोटो दाखवले आणि हिंदुत्व खतऱ्यात आलं. अटक करा, कारवाई करा. कठोर करावाया करा. सरकार तुमच्या हातात आहे. अशा घटना घडल्या किंवा घडवून झाल्या की राज्यातील एका विशिष्ट संघटनेला निरोप दिला जातो. या संघटनांचे लोक एकत्र येतात.

अर्ध शिक्षित मुलं असतात, त्यांची माथी भडकवली जातात. मग अशा प्रकारे उन्माद निर्माण करून राज्य अस्थिर करून खतऱ्यात खतऱ्यात म्हणून निवडणुकांना सामोरे जायचं असं घाणेरडं राजकारण सुरू आहे. म्हणून त्याचाच फायदा घेऊन इथले उद्योग बाजूच्या राज्यात न्यायचे. महाराष्ट्र अस्थिर आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही म्हणायचं. सर्व गुजरात राज्यात न्यायचं असं कारस्थान सुरू आहे. आमचे लोकं त्याला दुर्देवाने बळी पडत आहेत, असा दावा त्यांनी केला.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.