‘कपिल देवला बॉल कसा घासायचा हे जय शाह यांनी शिकवलं’; राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याची चर्चा
निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. त्याआधी सर्व नेते जोरदार ताकद लावत प्रचाराला लागत असल्याचं दिसत आहे. भोरमध्ये झालेल्या सभेत राज्यातील एका बड्या नेत्याने थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुलावरच निशाणा साधला आहे. नेमकी कोणी टीका केली जाणून घ्या.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सभा घेत फिल्डिंग लावत असल्याचं दिसत आहे. महायुती आणि मविआकडून आता जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील बारामती मतदारसंगाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. मविआकडून आज भोरमधील हरिश्चंद्री येथे सभा घेण्यात झाली. या सभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा मुलगा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोणत्या नेत्याने केली टीका?
हातामध्ये बॅट न धरता जय शाह बीसीसीआयचा अध्यक्ष बनला. मला कुणीतरी विचारलं की, जय शाह आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्कर यांना जय शाह यांनी शिकवलं. कपिल देवला बॉलिंग, बॉल कसा घासायचं हे जय शाह यांनी शिकवलं. विरेंद्र सेहवागला सिक्स मारता येत नव्हता. ते जय शाहने शिकवलं. त्यामुळे जय शाह भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष असल्याचा असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला.
जलद गतीने फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून किंवा या फेकाफेकीचा खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करावा, त्या खेळाचं कोच म्हणून नरेंद्र मोदी यांची नेमणूक करावी, असा प्रस्ताव आमचा शरद पवार यांच्याकडे आहे. कारण त्यांचा खेळाशी संबंध आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचाही खेळाशी संबंध आहे, असं म्हणत राऊत यांनी राऊतांवर निशाणा साधला.
दरम्यान, भोरमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यासोबतच काँग्रेसटचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे शरद पवार असल्याचं सांगितलं. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष भोर तालुक्याने पाहिलाय. अनंतराव थोपटे यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी भोरमध्ये सभा घेतली होती. आता राजकीय समीकरण बदलली असून त्यांचेच पुत्र संग्राम थोपटेंना पवार यांनी पाठिंबा दिला आहे.