सीमाबांधवांनी आम्हाला कधीही हाक मारावी, सगळी बंधनं तोडून आम्ही तिथं येऊ…; ठाकरे गटाने कन्नडिगांबरोबर शड्डू ठोकला…
सीमाप्रश्न सुटावा म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्याचबरोबर शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाने सीमावादासाठी 69 हुतात्म्यांचे बलिदान दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
मुंबईः सीमाप्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारने शेपूट घातली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना मात्र सीमाबांधवांच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. सीमावादात पहिल्यापासून शिवसेना हा एकमेव पक्ष सीमाबांधवांच्या पाठीशी उभा राहिला आहे. ज्या वेळेपासून सीमावाद सुरु झाला आहे त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिले होते असंही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
सीमाप्रश्न सुटावा म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्याचबरोबर शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाने सीमावादासाठी 69 हुतात्म्यांचे बलिदान दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटल्यापासून मराठी भाषिकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांकडून आपल्या सीमावादाचा फक्त राजकारणासाठी वापर केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यावर खासदार संजय राऊत यांनी 1 नोव्हेंबर या काळा दिन पाळला जात असताना हजारो मराठी बांधव रस्त्यावर उतरले नसते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सीमाभागातील मराठी बांधवांना बळ देताना खासदार संजय राऊत यांनी आवाहन केले आहे की, बेळगावच्या जनतेनं आम्हाला कधीही हाक मारावी, आम्ही सगळी बंधनं तोडून तिथं पोहचू असा विश्वास आणि बळ सीमाभागातील मराठी भाषिकांना संजय राऊत यांनी दिले आहे.
सीमाप्रश्नावरून सरकारर टीका करताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सीमाप्रश्नी सरकारने शेपूट घातले असेल पण ठाकरे गट सीमाबांधवांच्या पाठीशी आहे असा विश्वासही त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांनी दिला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्याील काही गावांवर दावा केला होता. त्यामुळे सीमावादावरून पुन्हा ठिणगी पडली होती.
त्यामुळे 24 नोव्हेंबरपासून सीमावादावरून दोन्ही राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे या वादावर बोलताना संजय राऊत यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यानी शिवसेनेला कधीही हाक मारावी, आम्ही सगळी बंधनं तोडून तिथं येऊ असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.
संजय राऊत यांच्या टीकेमुळे आता सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जाते.