अभिषेक घोसाळकरांना मारणारा मॉरिश चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत कोणी केला आरोप?
दहिसरमध्ये ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा आरोपीचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो ठाकरे गटाच्या नेत्याने पोस्ट केला आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केल्याची माहिती समजत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून ठाकरे गटाचे नेत्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. अशातच घोसाळकर यांना मारणारा आरोपी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करत ठाकरे गटातील बड्या नेत्याने गंभीर आरोप केलाय.
महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश नरोन्हा चार दिवसांपूर्वीच र्षा बंगल्यावर होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय) आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस… pic.twitter.com/px2scxZ4jV
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात.गृहमंत्री अदृश्य झाले आहेत. राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक असल्याचं संजय राऊत म्हणाले.