“…तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण”; राऊतांनी टीका करताच शिवसेनेने राजकाणाची संस्कृती सांगितली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की, की मला तुम्ही कितीही शिवा शाप द्या,किती पण टीका करा पण माझं उत्तर हे कामातून असेल आम्ही पातळी कधी सोडली नाही सोडणारदेखील नाही

...तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण; राऊतांनी टीका करताच शिवसेनेने राजकाणाची संस्कृती सांगितली
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 10:27 PM

मुंबई : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनी आणि आरोप-प्रत्यारोपांनी घडत असतानाच मविआतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे मला वाटतं जसं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे आणि एक वेगळी संस्कृती आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण गढूळ झाले आहे. जिथे विरोधकदेखील एकमेकांचे नाव आदराने घेत असतात. मात्र आज त्या सगळ्या पातळ्या सोडून दिल्या जात असल्याची टीकाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी टीका करताना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचे काम सुरू करतात ते रात्रीपर्यंत त्यांची टीका करणे सुरूच असतं. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती ही दूषित करण्याचे हे काम केले जाते आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मला वाटतं बाकीचे राज्य आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात, ती राज्य आपल्याकडे ज्या भावनेने पाहतात, जे युवक आपल्याकडे कसे बघतात त्यावर विचार करुन आपण आपले काम केले पाहिजे आणि टीका टिप्पणी केली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सत्ता येते, सत्ता जाते तसेच राज्यात या अगोदरदेखील सत्ता आल्या होत्या आणि सत्ता उलटवल्या गेल्या होत्या. पुन्हा लोक सत्तेत आले पण गेल्या दहा महिन्यांपासून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले आहे, त्यावेळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने सरकार उलथवून लावले आहे तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण केलं जातं आहे.

त्यामुळे त्यांनी म्हटले आहे की, मला लोकांना हे सांगायचं आहे की, आपण व्यक्त झालं पाहिजे मात्र चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे आणि सध्याच्या राजकारणात जे चालले आहे तसे मात्र व्यक्त होऊ नकास असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

त्यामुळे आता कामाचे उत्तर कामाने दिले पाहिजे शिव्या शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की, की मला तुम्ही कितीही शिवा शाप द्या,किती पण टीका करा पण माझं उत्तर हे कामातून असेल आम्ही पातळी कधी सोडली नाही सोडणारदेखील नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.