“अडीच वर्षांत जी कामं झाली नाही ती गेल्या 5 महिन्यात झाली” शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला
अगोदर मंत्री, खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र आता आमदार, खासदारांपासून जनसामान्यापर्यं मातोश्रीची दारं खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
मुंबईः राज्यातील शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, दीनदुबळ्यांच्या असतील या सगळ्यांची कामं गेल्या अडीच वर्षात जी कामं झाली नाहीत, ती आता या पाच महिन्यात झाली आहेत असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यातील जी कामं गेल्या अडीच वर्षात झाली नव्हती. त्या कामांना आता वेग आला आहे. गोरगरीबांची आणि शेतकऱ्यांची कामं गतीने होत असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी मातोश्रीचा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मातोश्रीवर टीका करताना सांगितले की, गेल्या अडीच वर्षात मातोश्रीची दारं सगळ्यासाठी बंद होती, मात्र आता मातोश्रीची सगळी दार, सगळ्यांसाठी खुली आहेत.
अगोदर मंत्री, खासदार, आमदारांनाही मातोश्रीवर प्रवेश नव्हता. मात्र आता आमदार, खासदारांपासून जनसामान्यापर्यं मातोश्रीची दारं खुली असल्याचा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी आता राज्यातील सगळ्यांना माहिती आहे की, सगळ्यांची सकाळ कोण खराब करते असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. त्यांचे नाव न घेता सगळ्यांची सकाळ कोण खराब करते असा सवाल करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीआहे.