“खासदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही”; मुख्यमंत्र्यांनी या परंपरेला काळीमा फासल्याची ठाकरे गटाची टीका…

आमच्याकडे अद्वैत हिरे आलेत आमच्याकडे जैन समाजाचा आशिर्वाद आहे, आमच्याकडे उत्तर प्रदेशचे नेते आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

खासदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही; मुख्यमंत्र्यांनी या परंपरेला काळीमा फासल्याची ठाकरे गटाची टीका...
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 4:11 PM

मुंबईः केंद्र सरकारकडून उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी आम्ही जाणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. आजच्या खासदारांच्या बैठकीला आम्ही खासदार जाणार नाही कारण सध्या या बैठकीची चेष्ठा सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परंपरेला काळीमा फासलाय आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांवर करण्यात आली आहे.

विनायक राऊत यांनी या बैठकीवर टीका करताना हा सगळा फार्स आहे ही बैठक यापूर्वीच नियोजित केली होती मात्र कुठल्या कारणास्तवती रद्द केली हेसुद्धा आम्हाला सांगण्यात आलं नाही.

आज संध्याकाळी साडेपाच वाजता ही बैठक ठेवली आहे. दिल्लीला उद्यापासून अर्थसंकल्प सुरू होत असतानाही संसदेचे आणि त्यामुळे तिथे जाणे गरजेचे असल्याने आम्ही या बैठकीत उपस्थित राहणार नसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे

धनुष्यबाणाच्या न्यायालयाच्या निर्णयावविषयी बोलताना त्यांनी विश्वासाने हे चिन्ह शंभर टक्के आम्हालाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

न्यायालयाच्या निकालाविषयी सांगताना ते म्हणाले की, हा निकाल आमच्या बाजूने लागेल कारण आम्ही कागदपत्रांची सगळी पूर्तता केलेली आहे.

आणि पुरावे दिलेले आहेत त्या आधारावर जर निर्णय झाला तर आमच्या बाजूने निकाल लागणार हा आम्हाला विश्वास आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की राजकीय दबावपोटी त्यांनी असा कुठलाही निर्णय देऊ नये अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जर आमच्या बाजूने निकाल लागला नाही, न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे. तिथेही आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत आजचा निकाल जर आमच्या बाजूने लागला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार…

गजानन कीर्र्तीकर यांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी शिंदे गट गाठला आहे. हे जग जाहीर आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा मार्चपर्यंत डिसक्वालिफायच निर्णय येईल तेव्हा खरं समोर येईल असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे सर्व राष्ट्रीय नेत्यांना भारी पडत आहेत. त्यामुळे आता मोदींना त्यांच्यासमोर आणावा लागते, आता मुंबईमध्ये आणावं लागतंय, कारण यांना कळालंय की यांचे हवा आता उतरलेली आहे.

आणि ज्या ज्या कामांचे उद्घाटन होतं आहे ते सगळं मग यांच्या काळात झालेले आहे आणि उद्घाटनाचे आता हे करतात श्रेय घेण्याचं काम हे लाटण्याचे काम करत होते,

डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आमचे प्रयत्न नेहमी सुरू असतात पण जे पैशांच्या अमिषापोटी जात आहे त्यांना रोखण्याची आम्हाला गरज नाही.

आमच्याकडे अद्वैत हिरे आलेत आमच्याकडे जैन समाजाचा आशिर्वाद आहे, आमच्याकडे उत्तर प्रदेशचे नेते आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

शिंदेंचे सरकार आउट घटकेचे सरकार आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर यांचे विसर्जन 1001 टक्के आहे यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे.

हिंदी गटाकडून भाजप पक्षाची इमेज खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आमदार मारतो आहे तर दुसरा आमदार शेतकऱ्यांना शिव्या घालतोय आहे तिसरा आमदार महिलांना मारतोय आणि मुख्यमंत्री भूखंड घोटाळ्यात अडकले त्यामुळे भाजपला हे परवडणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.