VIDEO: कोणत्याही महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, नवाब मलिक यांनी सांगितली व्यवहारिक कारणं

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी ताणून धरलेली असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे.

VIDEO: कोणत्याही महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, नवाब मलिक यांनी सांगितली व्यवहारिक कारणं
Nawab Malik
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 12:05 PM

मुंबई: एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी ताणून धरलेली असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे. कोणत्याही महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, असं सांगतानाच मलिक यांनी याबाबतची व्यावहारिक कारणंही दिली आहेत.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोणत्याही महामंडळाला सरकारमध्ये विलीनकरणं शक्यच नाही. एका महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला तर इतर महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांनाही तोच दर्जा द्यावा लागेल. त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारला कर्ज काढावा लागेल. ते योग्य होणार नाही आणि व्यवहारिकही नाही, असं मलिक म्हणाले.

भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. पण भाजपचे दोन आमदार एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. काही आमदार एसटी डेपोत जाऊन कामगारांना भडकावत आहेत. भाजप संप भडकावण्याचा खेळ खेळत होती. आता कर्मचाऱ्यांना सर्व लक्षात येत आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर येत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

राणे नवस करून करून थकले

मार्चमध्ये राज्य सरकार कोसळणार असल्याचं केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं होतं. राणेंच्या या आरोपाची त्यांनी खिल्ली उडवली आहे. 1999मध्ये राणेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. मुख्यमंत्रीपदासाठी ते काँग्रेसमध्ये आले. नंतर भाजपमध्ये गेले. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून ते सिंधुदुर्गात नवस मागत आहे. नवस पूर्ण झाला तर कोंबडं, बकरं वाहिल असं ते सांगत आहेत. त्यांच्या या नवसामुळे गेल्या 23 वर्षात बकरे आणि कोंबड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमीत कमी या कोंबड्या-बकऱ्यांची लाज राखावी म्हणून सरकार पडणार असल्याच्या वल्गना राणे करत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

आयटी सेलचा फर्जीवाडा उघड केला

काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे केंद्राच्या संसदीय समिती आणि संरक्षण समितीच्या बैठकीला गेले होते. पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही दिल्लीत होते. कालच राणेंनी मार्चमध्ये सरकार बनवणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर लगेचच एक मॉर्फ फोटो व्हायरल झाला. या फोटोत अमित शहा शानमध्ये बसले दिसत आहेत. पवारांचा ज्या पद्धतीने फोटो व्हायरल केला तो पवारांना अपमानित करण्याचा प्रकार होता. तो मॉर्फ फोटो होता. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा अधिक काळ चालणार नाही. आम्ही पवारांचा असली फोटोही व्हायरल केला. भाजपच्या आयटी सेलचा फर्जीवाडा उघड केला, असं सांगतानाच आमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. त्यांनी खुशाल वारंवार भविष्यवाणी करावी. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सातत्याने स्वप्नं पाहावी. आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणारच, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपमधील काँग्रेसी नेते अस्वस्थ

सरकार पाच वर्ष चालेल. आमची आघाडी 25 वर्षासाठी आहे हे मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप हताश आहे. त्यामुळेच सरकार पडण्याबाबत वारंवार विधानं केली जात आहेत. मूळचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये गेले होते. तिथे ते अस्वस्थ आहेत. त्यांना पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीत यायचं आहे. त्यांना थोपवून धरण्यासाठीच भाजपचे नेते अधूनमधून सरकार पडण्याची भाषा करत आहेत. सरकार पडण्याच्या बातम्या प्लांट केल्या जात आहेत. फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जात आहेत. म्हणूनच राणेंनीही काल ते विधान केलं, असा चिमटा त्यांनी काढला.

संबंधित बातम्या:

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा डाव, अमित शहांकडे तक्रार करणार; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

दोन महिन्यांपासून माझ्यावर, माझ्या नातवांवरही पाळत, हेरगिरी करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करणार: नवाब मलिक

भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.