Mukesh Ambani bomb scare : तपास अधिकारी सचिन वाझे यांना हटवलं, आता तपास कुणाकडे?

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. (Mukesh Ambani house explosive loaded Scorpio

Mukesh Ambani bomb scare : तपास अधिकारी सचिन वाझे यांना हटवलं, आता तपास कुणाकडे?
मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण तपासी अधिकारी बदलला
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 6:03 PM

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी  बदलल्याचं वृत्त 2 मार्च रोजी आलं. क्राईम ब्रँचच्या सीआययू युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती आहे.(Mukesh Ambani house explosive loaded Scorpio case investigation officer changed by Mumbai Police)

धक्कादायक म्हणजे द्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren)  असं स्कॉर्पिओ मालकाचं नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंबानी प्रकरणातील तपास अधिकारी IO सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तपासात प्रगती नसल्यानं तपास अधिकारी बदलला

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारीला सापडली होती. 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 1 वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. या युनिटचे प्रमुख ए पी आय सचिन वाझे हे आहेत. वाझे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र, तपासात प्रगती नसल्यानं तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. 25 ते 28 फेब्रुवारी या काळात सी आय युचं पथक तपास करत होतं. मात्र,आता या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.

सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे तपास

सचिन वाझे यांच्या ऐवजी हा तपास आता सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस आली आहे. घटना घडून आता एक आठवडा होत आहे मात्र, तपासात काहीच प्रगती नाही. यामुळे आता हा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची आत्महत्या

द्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांनी कळवा मुंब्रा रेतीबंदर भागात आत्महत्या केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. (Hiren Mansukh found dead owner of scorpio with explosives found near Ambanis house ) गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती.

VIDEO सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया

मुकेश अंबानीचं अँटेलिया हे जगातील सर्वात महागडं घर?

दरम्यान, जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर, देशातील सर्वात महागडं हे घर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. या बंगल्याच्या इंटेरियरवर बरंच काम करण्यात आलं आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उचं आहे. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6 हजार कोटी रुपये आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर( जवळजवळ 125 अब्ज) आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च आला होता. 8 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणारही नाही, असा दावा केला जातो.

संबंधित बातम्या: 

Who is Sachin Vaze : अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?  

Mukesh Ambani bomb scare : फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

(Mukesh Ambani house explosive loaded Scorpio case investigation officer changed by Mumbai Police)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.