मुकेश अंबानी यांच्या मुलाचा आज शाही विवाहसोहळा
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आज (9 मार्च) दुपारी लग्न बंधनात अडकणार आहे. हा लग्न सोहळा जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार आहे. या लग्न समारंभासाठी मुंबईतील मुकेश अंबानीच्या घराला आकर्षित अशी सजावट करण्यात आली आहे. या लग्नामध्ये जगभरातील पाहूणे येणार आहेत. यासोबतच बॉलिवूड […]
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आज (9 मार्च) दुपारी लग्न बंधनात अडकणार आहे. हा लग्न सोहळा जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार आहे. या लग्न समारंभासाठी मुंबईतील मुकेश अंबानीच्या घराला आकर्षित अशी सजावट करण्यात आली आहे. या लग्नामध्ये जगभरातील पाहूणे येणार आहेत. यासोबतच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचाहीया शाहीविवाह सोहळ्यात समावेश असणार आहे.
मुंबईतील जिओ सेंटर येथे हा शाहीविवाह सोहळा पार पडणार आहे. यांतर 10 मार्चला वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. तर 11 मार्चला वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यावेळी दोन्ही परिवार आणि जवळचे मित्रमंडळी असतील. रिसेप्शन सोहळाही जिओ सेंटर येथे होणार आहे.
या सोहळ्याआधी नुकतेच वरळीतील एनएससीआय स्टेडियम येथे मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोण आहे श्लोका मेहता?
श्लोका मेहता हिरा व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. आकाश-श्लोका या दोघांनी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून शिक्षण घेतलं आहे. शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर श्लोका 2009 मध्ये न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी गेली. ती द लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स अँड पॉलिटिकल महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदव्युत्तर झाली आहे. श्लोका रोजी ब्लू फाउंडेशनची डायरेक्टर आहे. तसेच ती ConnectFor ची संस्थापक आहे.