Vidhan Parishad Election : पक्षादेश म्हणत मुक्ता टिळकांनी पाळला शब्द; तर लक्ष्मण जगतापांनीही अॅम्ब्युलन्सनं येत विधान परिषदेसाठी दिलं मत

पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक मागील काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. आज मतदान आहे. पक्षाने दिलेले आदेश पाळायचे हे आधीपासून रक्तात भिनले आहे. त्यामुळे मी आज मतदान करायला जात आहे, असे मुक्ता टिळक म्हणाल्या.

Vidhan Parishad Election : पक्षादेश म्हणत मुक्ता टिळकांनी पाळला शब्द; तर लक्ष्मण जगतापांनीही अॅम्ब्युलन्सनं येत विधान परिषदेसाठी दिलं मत
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपा नेत्यांची भेट घेताना मुक्ता टिळकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 6:34 PM

मुंबई : विधान परिषदेसाठी आज मतदान (Vidhan Parishad Election) झाले. या मतदानात पुण्याच्या कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak), लक्ष्मण जगतापदेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्याशी मुक्ता टिळक आल्या त्यावेळी त्यांनी बातचीत केली आणि हस्तांदोलनही केले. तर अरे वाह, तीन मतदार दिसतायेत, असा मिश्कील शेरा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मारला. मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे आजारी अजून कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. अशा स्थितीतहीते मुंबईला अॅम्ब्युलन्सने मतदानासाठी आले होते. पक्षादेश पाळणार, असे त्यांनी आधीच सांगितले होते. आताच नाही, तर राज्यसभेच्या मतदानावेळीदेखील अॅम्ब्युलन्समधून येत त्यांनी आपले मत नोंदवले होते.

कर्करोगाशी झुंज

पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक मागील काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहेत. आज मतदान आहे. पक्षाने दिलेले आदेश पाळायचे हे आधीपासून रक्तात भिनले आहे. त्यामुळे मी आज मतदान करायला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील अशापद्धतीने मतदान झाल्याचे सांगितले आहे, असे मतदान करण्याआधी मुक्ता टिळक म्हणाल्या. तर मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुक्ता टिळक यांना भेटले. यावेळी त्यांनी मुक्त टिळक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्यसभेतल्या विजयाचे श्रेय त्यांनी मुक्त टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना दिले होते.

तपासणी करून मगच मतदान

19 जूनला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन स्टेबल होईल. त्यानंतर 20 तारखेला थेट मतदानाला जाईल, असे मुक्ता टिळक यांनी शुक्रवारीच जाहीर केले होते. तर दुसरीकडे भाजपाने यावर सावध भूमिका घेतली होती. प्रकृतीचा अंदाज घेऊनच त्यांनी मतदान करावे, की नाही याचा निर्णय घेण्यात येईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे स्पष्ट केले होते. मतदान करण्यावर ठाम असल्याने मुक्ता टिळक यांनी आपला शब्द पाळत विधान परिषदेत मतदानाचा हक्क बजावला.

हे सुद्धा वाचा

जगतापांचे फडणवीसांनी केले कौतुक

प्रकृती ठीक नसेल तर येऊ नका, असा आदेश पक्षाने दिला होता. मात्र आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठीक आहे. ते मतदान करतील, अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी माध्यमांना दिली. पक्षाने कोणताही आग्रह धरला नव्हता, असेही ते म्हणाले. दरम्यान, मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांचे आभार मानले, कौतुक केले. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारणाही केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.