क्रुझवर पोहोचण्याआधीच आर्यन खानला अटक, मुकूल रोहतगी यांची कोर्टाला धक्कादायक माहिती; आर्यन प्रकरणात ट्विस्ट?

| Updated on: Oct 26, 2021 | 6:12 PM

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. (Mukul Rohatgi cites Centre's reform plans in Aryan's bail plea)

क्रुझवर पोहोचण्याआधीच आर्यन खानला अटक, मुकूल रोहतगी यांची कोर्टाला धक्कादायक माहिती; आर्यन प्रकरणात ट्विस्ट?
aryan khan
Follow us on

मुंबई: क्रुझवर पोहोचण्याआधीच आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती, अशी धक्कादायक माहिती आर्यनचे वकील मुकूल रोहतगी यांनी कोर्टात दिली आहे. त्यामुळे आर्यन खान अटक प्रकरणात ट्विस्ट आला आहे.

आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.

पार्टीचं तिकीटही नव्हतं

आर्यनने ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं. तसेच तसेच त्यांनी ड्रग्ज बाळगलंही नव्हतं. मग मागील 20 दिवसांपासून आर्यनला कारागृहात का ठेवण्यात आले?, असा सवाल त्यांनी केला. तसेच ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यनला तुरुंगात का नेलं? त्याला नशा मुक्ती केंद्रात का ठेवलं नाही?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आर्यनकडे पार्टीचं तिकीटही नव्हतं. त्याला केवळ पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं, असं सांगतानाच आर्यनचा मोबाईल जप्त केल्याचं पंचनाम्यात नमूदच नसल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

ऑनलाईन गेमिंगची चर्चा

आर्यन खानचा संबंध फारतर अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझवर नव्हता. त्याला घरून अटक करण्यात आली आहे. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे ही चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झाली आहे, असा दावा रोहतगी आणि आणि अमित देसाई यांनी केला.

पंचनामाच वाचून दाखवला

मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते. कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानची चॅटिंग ही सगळी क्रूझ पार्टीच्या आधीची असल्याचा दावा रोहतगी यांनी केला.

आर्यनचे राजकीय संबंध नाहीत

आम्हाला कोणताही राजकीय नेता तसेच पंच यांची बाजू घ्यायची नाही. तसेच त्यांची बाजू घेऊन हे माझे प्रकरण किचकट करायचे नाही. तसेच राजकीय व्यक्ती तसेच पंचांशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असा युक्तीवादही त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या:

‘आर्यन खानविरोधात कट रचला जातोय, त्याची अटक चुकीची’ मुकुल रोहतगींचा युक्तीवाद; आर्यनला जामीन मिळणार?

आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीश उठले; सर्वांनाच बाहेर काढलं

VIDEO: केपी गोसावींचा मनसुख हिरेन होऊ नये, नवाब मलिकांनी व्यक्त केली भीती

(Mukul Rohatgi cites Centre’s reform plans in Aryan’s bail plea)