बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. (Mumbai 150 Vendors tested Corona Positive)
मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. (Mumbai 150 Vendors tested Corona Positive)
दिवाळीनंतर अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली, गुजरात, राजस्थान या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे.
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन जोरात कामाला लागली आहे. बाजारातील विक्रेत्यांद्वारे संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने शोधमोहिम सुरु केली होती.
या पार्श्वभूमीवर मुंबईत दररोज 18 ते 19 हजार लोकांची आरटीपीसीआर आणि जलद चाचणी घेण्यात येत आहे. यात सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी केली जाते. यानुसार गेल्या चार दिवसांत मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये सुमारे 12 हजार दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी घेण्यात आली.
यात गेल्या पाच दिवसात 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष यात एकूण चाचण्यांपैकी सुमारे 3000 संभाव्य स्प्रेडर्सची चौकशी केली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. (Mumbai 150 Vendors tested Corona Positive)
Corona Virus | भारतात सलग तीन आठवडे कोरोना रुग्णसंख्या वाढ स्थिरावली, मृत्यूदरही घटला#corona #coronavirus #coronaupdate https://t.co/JoCM5Uq2v1
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
संबंधित बातम्या :
बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील परिसरातील 50 लाख लोकांची तपासणी होणार
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वाशी खाडी पुलाला लागून तिसऱ्या खाडी पुलाच्या कामाला प्रारंभ