मुंबई 24 तास, जीवाची मुंबई आता जेवायची, नाईट लाईफचे चार नियम
"पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर (Night Life In Mumbai) दिली.
मुंबई : मुंबई शहर हे धावत शहर, पर्यटकांची रेलचेल ही नेहमी असते. नाईट शिफ्टमध्ये काम करणारे लोक सुध्दा जास्त आहेत. पण मध्यरात्री खाण्याची सोय (Night Life In Mumbai) नसते. ना कोणतीही खरेदी करता येते. पण आता मुंबईत हे सर्व शक्य होणार आहे. कारण आता मुंबई नाईट लाईफची परदेशी संकल्पना राबवली जात आहे. त्याची सुरुवात मुंबईत 26 जानेवारी रात्रीपासून झाली, पण पहिल्या दिवशी मुंबईत नाईट लाईफ फारशी पाहायला मिळाली नाही. “पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर (Night Life In Mumbai) दिली.
मुंबईत आज मध्यरात्रीपासून नाईट लाईफ सुरु झाली. ज्यात रात्रभर मॉल, हॉटेल्स, थिएटर्स चालू राहणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना अगदी मध्यरात्रीही शॉपिंग आणि जेवण्याची हौस भागवता येणार आहे. दरम्यान मुंबईच्या नाईट लाईफमध्ये पब आणि बारचा समावेश नाही. पब आणि बार यांना रात्री दीडपर्यंतच मद्यविक्रीची परवानगी असून यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही.
नाईट लाईफचे नियम नेमके काय?
- मुंबई पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. त्यांची नेमकी काय काय जबाबदारी असणार याचे नियम बनवले आहेत.
- नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी नियम पाळणे गरजेचे आहे. याची विस्तृत नियमावली महापालिकेने बनवली आहे.
- रात्री दीड वाजल्यानंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे.
- तसेच रात्री दीडनंतर दारु विक्री करतानाही कोणीही आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. त्याशिवाय त्याठिकाणच्या मॉल किंवा मिलला नाईट लाईफ सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली जाईल. कामगार कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी केली जाईल.
“पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल. मुंबईत 24 तास हा कायदा आपण उपलब्ध करुन दिला आहे. लगेच काही सगळं एकत्र सुरु होऊ शकणार नाही. काही नियम आपण घालून दिले आहेत. सुरक्षाव्यवस्था, कामगारांच्या तीन शिफ्ट, कचरा वर्गीकरण यांसारख्या बाबी पूर्ण झाल्यानंतर सर्व सुरळीत सुरु होऊ शकेल.”
“त्यासाठी कदाचित एक महिनाही लागेल. पुढचे कितीतरी वर्षे आता ही लाईफस्टाईल असेल. हा कुठला एक दिवसाचा फेस्टिवल नाही. आपण ऑनलाईन 24 तास शॉपिंग करतो. ती संधी रिटेलर्सला उपलब्ध करुन देत आहोत,” अशी प्रतिक्रिया पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
मुंबईत गिरगाव चौपाटी, जुहू, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल. पण एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील. जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. पण सध्या तरी हे फूड ट्रक सुरु (Night Life In Mumbai) नाहीत.
“मुंबईतील रेस्टॉरंटप्रमाणे मोठे मॉल सुद्धा चालू ठेवले जाणार आहेत. मात्र लोअर परेलमधील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमधील 300 दुकानांपैकी फक्त 3 ते 4 दुकान सुरु होती. ही दुकानही रात्री 3 वाजेपर्यंत सुरु होती. नाईट लाईफ सुरू झाली असली तरी याचं नियोजन करण्यासाठी वेळ जात आहे,” असं दुकानदारांचं म्हणणं आहे.
“नाईट लाईफ ही चांगली आहे. पण ती सुरक्षित असावी अशी ही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आता कधी जेवता येईल हे चांगलं आहे,” असे लोकांनी म्हटलं आहे.
“मुंबईतील रेस्टॉरंट हे नेहमी जास्तीत जास्त 12 पर्यंत चालू असतात. पण आता हे 24 तास खुले असणार आहेत. यासाठी सर्व परवानग्या घेणं काम बाकी आहेत. दक्षिण मुंबईत फिरत असताना परेल येथे एक रेस्टॉरंट नाईट लाईफ अंतर्गत चालू असलेलं पाहायला मिळालं. बाकी जास्त प्रमाणात रेस्टॉरंट चालू नव्हते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
“रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरा जेवण मिळत असल्याने ग्राहक खुश आहेत. मुंबईत नाईट आउट करणारे तरुण सुद्धा खुश आहेत. कारण त्यांना नाईट आउट करताना खाण्याचं टेन्शन नसणार आहे,” अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.
मुंबईत नाईट लाईफ सुरु झाली म्हणून नवी मुंबईत राहणारे शर्मा कुटुंब मुंबईत आले. पण त्यांना नाईट लाईफ मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये 12 च्या अगोदर अर्धी ऑर्डर घेतली. त्यापुढे मात्र त्यांना काहीही मिळालं नाही.