Mumbai 26/11 Attack : आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी बसून रडणाऱ्या 2 वर्षांच्या मोशेचा जीव कसा वाचला?

Mumbai 26 11 Attack moshe holtzberg youngest survivor : रक्ताने माखलेल्या आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी बसून 2 वर्षांचा इस्रायली चिमुकला रडत होता. 26/11 हल्ल्यातून वाचलेला सर्वात लहान चिमुकला बेबी मोशे... सध्या काय करतो? मुंबई हल्ल्यात त्याचा जीव कसा वाचला?

Mumbai 26/11 Attack : आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारी बसून रडणाऱ्या 2 वर्षांच्या मोशेचा जीव कसा वाचला?
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 11:30 AM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : 26/11 दहशतवादी हल्ला… मुंबईसह देशाच्या इतिहासातील भळभळती जखम… या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पा नागरिकांचा जीव गेला. पर्यटनासाठी आलेल्या निरापराध परदेशीशी पर्यटकांनाही आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने केलेल्या या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला. तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले. लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत हाहा:कार माजवला. यात ज्या नागरिकांचा जीव वाचला त्यात सर्वात लहान होता. इस्रायलचा चिमुकला मोशे होल्त्जबर्ग… त्याने आपल्या आई वडिलांना गमावलं. पण लहानग्या बेबी मोशेचा जीव कसा वाचला? पाहुयात…

बेबी मोशेचा जीव कसा वाचला?

मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा बेबी मोशे आपल्या आई वडिलांसह मुंबईत आला होता. 26 नोव्हेंबर ची रात्र होती. बेबी मोशे हा वडील गैवरिएल होल्त्जबर्ग आणि आई रिवका यहूदी यांच्यासोबत मुंबईच्या नरीमन हाऊसमध्ये होता. इथं त्यांच्यासोबत मोशेची भारतीय आया सैंड्रा सैमुअल देखील होती. याच वेळी अचानक दहशतवादी हल्ला झाला. गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ लागला.

अन् मोशेचा जीव वाचला…

सैंड्रा सैमुअल घाबरली होती. ती नरिमन हाऊसमधल्या एका खोलीत लपून बसली. पण इतक्यात मोशेच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून सैंड्रा बाहेर आली. तिथं तिनं पाहिलं ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन मृतदेह… हे मृतदेह होते मोशेच्या आई वडिलांचे… या दोघांच्या मृतदेहांच्या शेजारी बसून मोशे रडत होता. त्याला पाहून सैंड्राचं हृदय हेलावलं. ती पुढे आली आणि मोशेला तिने आपल्या छातीशी कवटाळलं अन् त्याला घेऊन ती तिथून बाहेर पडली.

सैंड्रा सैमुअलचा सन्मान

पुढेही सैंड्रा सैमुअलने मोशेला सुखरूप ठेवण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मोशेला तिने त्याच्या आजी-आजोबांकडे सोपवलं. मोशेचा सांभाळ करण्यासाठी सैंड्रा सैमुअलदेखील त्याच्यासोबत इस्रायलला गेली. आता तिला तिथली नागरिकत्व देण्यात आलं आहे. मोशेचा जीव वाचवल्यामुळे तिचं तिथं प्रचंड कौतुक झालं. इस्रायल सरकराने तिला ‘राइटियस जेनटाइल’ हा पुरस्कार दिला. इस्रायलमध्ये गैर-ज्यू लोकांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

तो सध्या काय करतो?

मुंबईत 2008 ला दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा बेबी मोशे हा केवळ 2 वर्षांचा होता. दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांमध्ये मोशे हा सर्वात लहान होता. मोशे सध्या 17 वर्षांचा आहे. तो सध्या इस्रायलच्या औफला शहरातील शाळेत शिक्षण घेतोय. तो त्याच्या आजी-आजोबांसोबत राहतो. त्याचा चुलता मोशे होल्त्जबर्ग अमेरिकेत असतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.