मुंबईत सर्वाधिक दरड कोसळण्याच्या घटना भांडुपमध्ये, 24 पैकी 21 वॉर्ड दरडीच्या छायेत

मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लवकरात लवकर अशा वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

मुंबईत सर्वाधिक दरड कोसळण्याच्या घटना भांडुपमध्ये, 24 पैकी 21 वॉर्ड दरडीच्या छायेत
Mumbai Landslide (फोटो प्रातनिधिक)
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 9:22 AM

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी चेंबूर-वाशीनाका येथे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांच्या घरावर दरड कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील जवळपास 50 हजार नागरिक हे दरडीच्या छायेत वास्तव्य करत आहेत. मुंबई शहरासह उपनगरातील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब जीवमुठीत घेऊन डोंगराळ भागात राहत आहेत. (Mumbai 291 landslides in 21 wards Dangerous ward in mumbai)

मुंबईतील 24 वॉर्डपैकी 21 वॉर्डमध्ये 291 ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सध्या मुंबईतील भांडुप, विक्रोळी, साकीनाका, कुर्ला, मलबार हिल या ठिकाणी नेहमीच दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर या ठिकाणी सर्वाधिक दरडी कोसळल्या आहेत.

धोकादायक विभाग आणि दरडीची ठिकाणे

भांडुप एस – 152 घाटकोपर एन – 32 कुर्ला एल – 18 ग्रँडरोड , डी विभाग – 16 मालाड पी उत्तर – 11 चेंबूर एम पूर्व – 11 वरळी जी दक्षिण 10

मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या

दरम्यान मुंबईत वाढत्या दरडी कोसळण्याच्या घटनांवरुन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचा आढावा घ्या, असे निर्देश महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये धोकादायक ठरु शकतील अशा जागी जर वस्ती असेल तर त्यांना तोंडी आणि लेखी नोटीसा देण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लवकरात लवकर अशा वस्त्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

तसेच गरजेनुसार तात्पुरत्या स्वरुपात किंवा कायमस्वरुपी धोकादायक जागांवरुन वस्ती स्थलांतरित करण्याबाबत पालिकेकडून लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.

(Mumbai 291 landslides in 21 wards Dangerous ward in mumbai)

संबंधित बातम्या :

Mumbai Rain | कुठे भिंत कोसळली, तर कुठे दरड कोसळली, मुंबईत तीन दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू

Mumbai Rain | मुंबईतील दरडी जीवघेण्या, 29 वर्षात 290 लोकांनी प्राण गमावल

मुंबईत 22,483 कुटुंबीय जगताहेत जीवमुठीत घेऊन, 10 वर्षांपासून दरडींवर उपाययोजनाच नाही; धक्कादायक माहिती उघड

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.