मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ मार्गिकेवर अतिरिक्त लोकल धावणार…

| Updated on: Dec 11, 2023 | 10:18 AM

Mumbai Additional local will run Western Railway : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे... लवकरच मुंबईत 'या' मार्गिकेवर 30 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. कधीपासून? कधी सुरु होणार ही सुविधा? कोणत्या भागात राहणाऱ्या, प्रवास करणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार? वाचा...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; या मार्गिकेवर अतिरिक्त लोकल धावणार...
Follow us on

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 11 डिसेंबर 2023 : मुंबई लोकल… मुंबईकरांची जीवनवाहिनी. एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं असेल. तर मुंबईकर लोकलने प्रवास करतात. स्वस्त आणि वेळ वाचवण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास करतात. पण लोकला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. मात्र आता लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे… कारण आता मुंबईत 30 अतिरिक्त लोकल धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे.

कुठे चालवली जाणार अतिरिक्त लोकल?

पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त 30 लोकल धावणार आहेत. गोरेगाव ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचं काम मेपर्यंत होणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. चाकरमान्यांची प्रचंड गर्दी असलेल्या या मार्गावर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकली जात आहे. या मार्गिकेचे काम एप्रिल-मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

किती अतिरिक्त लोक चालणार?

गोरेगाव ते बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेमुळे पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-विरार दरम्यान तब्बल 25 ते 30 अतिरिक्त लोकल चालवणं शक्य होणार आहे. नव्या लोकल फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण लाखो प्रवासी रोज लोकले प्रवास करतात. मात्र तरीही लोकलला प्रचंड गर्दी असते. अशात लोकलची संख्या वाढवली. तर मुंबईकरांसाठी हे फायदेशीर असेल.

किती प्रवासी लोकलने प्रवास करतात?

सध्या पश्चिम रेल्वेकडून 1 हजार 394 लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यामाध्यमातून दररोज 30 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तीन-चार मिनिटांनी लोकल चालवल्या जात असल्याने नव्याने लोकल चालवणं शक्य नव्हते. मात्र सहाव्या मार्गिकेमुळे रेल्वेला नवीन फेऱ्या चालवणे शक्य होणार असल्याने सध्याच्या लोकलमधील गर्दी कमी होऊ शकणार आहे.

बोरीवली ते चर्चेगेट या पश्चिम रेल्वे मार्गावर लाखो लोक लोकलने प्रवास करतात. अशात लोकलची संख्या वाढवली. तर ट्रेनमध्ये होणारी गर्दी कमी होईल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल.