मुंबईत रातोरात शेकडो कोरोनाबाधितांचे स्थलांतर, कारण काय ?

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील रुग्ण हलवण्यात येत आहेत. (mumbai corona patient cyclone tauktae)

मुंबईत रातोरात शेकडो कोरोनाबाधितांचे स्थलांतर, कारण काय ?
MUMBAI CORONA
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 11:02 PM

मुंबई : अरबी समुद्रात तौत्के चक्रीवादळ (cyclone Tauktae) घोंगावत आहे. या वादळामुळे आगामी काळातील वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबई पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील रुग्ण हलवण्यात येत आहेत. या सर्व कोविड सेंटर्समधील (Covid centre) एकूण 580 कोरोनाबाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात येत आहे. हे काम माहपालिका युद्धपातळी करत आहे. मुंबईचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (15मे) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णांच्या स्थलांतरावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आला. (Mumbai administration shifting 580 Corona patient from Three jumbo Covid centre smid Tauktae cyclone)

एकूण 580 कोरोनाबाधितांचे स्थलांतर

यावेळी बोलताना, “तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता आहे. तसा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात जोरदार पाऊससुद्धा पडू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून हे वादळ जात आहे. या काळात वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच कारणामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोविड रुग्णांना स्थलांतरित केले जात आहे. प्रामुख्याने तीन जंबो कोविड आरोग्य केंद्रांतील मिळून एकूण 580 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच (15 मे) सुरक्षितपणे स्थलांतरित करत आहोत,” असे अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले.

कोणत्या कोविड सेंटरमधील किती रुग्ण हालवणार ?

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईतील तीन जंबो कोविड केअर सेंटरमधील एकूण 580 रुग्ण हालवण्यात येणार आहेत. यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील 183 रुग्ण, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) कोविड केंद्रातील 243 रुग्ण आणि मुलूंड कोविड केंद्रातील 154 रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेले रुग्ण, प्राणवायूच्या पुरवठ्यावर असलेले रुग्ण या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर केले जात आहे.

स्थलांतरानंतर नातेवाईकांना माहिती द्या 

दरम्यान, रुग्णांचे स्थलांतर करताना प्राणवायू पुरवणारे सिलिंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर यंत्रणांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे करण्याचे आदेश काकाणी यांनी दिलेले आहेत. रुग्णांना स्थलांतरित केल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

Video | “आजही देवाकडे जास्त न बघता आईकडे बघतो,” मातेची आठवण येताच राज्यातील मोठा मंत्री गहिवरला

तौत्के चक्रीवादळ : पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला तयारीचा आढावा; एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्करासह सर्व यंत्रणा सज्ज

Cyclone Tauktae Tracker and Updates : रत्नागिरीत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

(Mumbai administration shifting 580 Corona patient from Three jumbo Covid centre smid Tauktae cyclone)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.