अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत महत्वाची बातमी; ‘तो’ ठराव मंजूर, आता उद्यापासून…

Ambadas Danve Suspension : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत महत्वाची बातमी... 'तो' ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता उद्यापासून दावने विधान परिषदेत दिसू शकतात. हे प्रकरण नेमकं काय आहे? दानवेंना निलंबित का करण्यात आलं? वाचा सविस्तर...

अंबादास दानवे यांच्या निलंबनाबाबत महत्वाची बातमी; 'तो' ठराव मंजूर, आता उद्यापासून...
अंबादास दानवे, प्रसाद लाड
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 3:37 PM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासुन अंबादास दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार आहेत. अंबादास दानवे यांनी सोमवारी विधानपरिषदेत बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यानंतर दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून दानवे विधानपरिषदेत दिसू शकतात.

अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई

अंबादास दानवे यांनी सोमवारी सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांना निलंबित केलं. अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात पाच दिवस सहभागी होता येणार नव्हतं. मात्र अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावरील कारवाई सभापतींकडून मागे घेण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर निषेध व्यक्त करण्याचा ठराव मांडण्यात यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. तसंच यावर अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, असं दरेकर म्हणाले. मग अंबादास दानवे बोलायला उभे राहिले. संबंधित विषय हा लोकसभेतला आहे. त्यावर इथं चर्चा होणं अपेक्षित नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.

अंबादास दानवे बोलत असतानाच सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला. त्यानंतर अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यांचा तोल ढासळला अन् दावने यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्याला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कारवाई करत दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं.

Non Stop LIVE Update
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.