पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही, विसरू नका; अमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

Amol Mitkari on Devendra Fadnavis : बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का?; अमोल मिटकरी यांचा एकनाथ शिंदेंसह फडणवीसांना सवाल

पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही, विसरू नका; अमोल मिटकरी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 11:02 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसल्याचंही मिटकरी म्हणालेत. तसंच बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का?, असा सवाल अमोल मिटकरींनी एकनाथ शिंदेंना विचारला आहे.

देवेंद्रजी फडणवीस वैफल्यग्रस्त झाले आहेत. नैराश्यातुन ते बेताल सुटले आहेत. पेशवे काळातील फडणीशी लोकशाहीत चालत नाही हे बहुतेक ते विसरलेत. मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहतो मात्र परवा मुलाखतीत ते आतुन पोखरल्याचे व शिंदें सोबत बिनसल्याचे स्पष्ट जाणवते आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

हे सुराज्य व्हावे हीच जनतेची इच्छा, अशी जाहिरात केल्याचा फोटो मिटकरींनी शेअर केलाय. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत नाही. त्यावरून अमोल मिटकरींनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? जनता माफ करेल असं वाटतं का?, अस, असं मिटकरी म्हणाले.

राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार आणण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. त्या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचं पक्क ठरलं. कशा प्रकारे सरकार स्थापन करायचं याची मोड्स ऑपरेंडी तयार झाली होती, असा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेबाबतचा करार झाला. अजित पवार आणि मी हे पुढे नेणार असं ठरलं. आम्हा दोघांना अधिकार दिले गेले. त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण तयारी केली. पण सरकार स्थापन करण्याच्या तीन चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली, असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत केला आहे. त्यावर अमोल मिटकरी यानी यावर भाष्य केलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.