‘बेस्ट’च्या सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज 225 रुपये भोजनभत्ता! परिवहन मंत्र्यांकडून मागणी मान्य

| Updated on: Nov 05, 2020 | 2:13 PM

कोरोना संकटाच्या काळात 'बेस्ट'च्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज 225 रुपये भोजनभत्ता देण्यात येणार आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.

बेस्टच्या सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज 225 रुपये भोजनभत्ता! परिवहन मंत्र्यांकडून मागणी मान्य
Follow us on

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात ‘बेस्ट’च्या सेवेत असलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांना दररोज 225 रुपये भोजनभत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे. मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी. महामंडळाच्या सुमारे 1 हजार बस बेस्टच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. त्यासाठी राज्यभरातील एस.टी. महामंडळाचे साडे चार हजार कर्मचारी मुंबईत बेस्टची सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना आता रोज 225 रुपये भोजनभत्ता दिला जाणार आहे.(ST employees who come to Mumbai for BEST’s service will get a meal allowance of Rs. 225 per day)

राज्यभरातून बेस्टच्या सेवेसाठी मुंबईत दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेकडे देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरवण्याची वेळ यात तफावत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या जेवणाची समस्या निर्माण झाली होती. त्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल मंत्री अनिल परब यांनी घेतली आहे. संबंधित संस्थेला दिलेलं कंत्राट तातडीने रद्द करत सर्व कर्मचाऱ्यांना रोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असा आदेश अनिल परब यांनी दिला आहे. या आदेशाचं पालन करत एस.टी. महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना रोज भोजनभत्ता देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबतही परिवहन मंत्र्यांचे आदेश

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या जेवणासह राहण्यासंदर्भातही अनेक तक्रारी होत्या. त्याबाबतही अनिल परब यांनी संबंधित यंत्रणेला आदेश दिले आहेत. एस.टी. कर्मचारी राहत असलेल्या निवास व्यवस्थेची रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती आणि क्षेत्रिय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकाच्या पाहणीनुसार अहवाल तयार करुन मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे.

बेस्टच्या सेवेसाठी राज्यभरातून येणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांची यापुढे राहण्याची आणि जेवणाची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहेत.

बेस्टच्या सेवेतील एस.टी. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू!

मुंबईतील बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २ नोव्हेंबरला घडली. भगवान गावडे असे या कर्मचाऱ्याचे नाव होतं. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. गावडे हे सोलापुरातील मंगळवेढा आगारात वाहक म्हणून काम करत होते. मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सोलापूर विभागातील 100 एसटी कर्मचारी गेले होते.

संबंधित बातम्या:

एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?’, निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल

मुंबईत बेस्टच्या दिमतीला गेलेल्या सोलापुरातील एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू, वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणे महाराष्ट्राला शोभत नाही- दरेकर

ST employees who come to Mumbai for BEST’s service will get a meal allowance of Rs. 225 per day