भुजबळांनीच जमीन लाटली; पत्रकार परिषद घेत अंजली दमानिया यांचा पुन्हा हल्लाबोल
Damania on Chhagan Bhujbal : पुन्हा पत्रकार परिषद पुन्हा आरोप... सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. काही वेळाआधी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. वाचा सविस्तर...
गोविंद ठाकूर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मागच्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत आहेत. छगन भुजबळ यांच्या बंगल्याच्या जागेवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशात भुजबळांचे पुतण्या समीर भुजबळ यांनी काल पत्रकार परिषद घेत दमानियांचे आरोप फेटाळले आहेत. पण दमानिया आपल्या आरोपांवर ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर आरोप केलेत.
परवेश कंपनी ही समीर भुजबळांची आहे. त्याच कंपनीने तिथं इमारत बांधली आहे. तेव्हा मी आरोप केले होते की समीर भुजबळ यांनी ही जागा लाटली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये समीर भुजबळ खोट बोलले आहेत. त्यांनी असे सांगितलं, ती आम्ही 2003 मध्ये त्यांना पैसे देत होते. त्यांनी सांगितलं की ह्या कुटुंबाने तेव्हा उत्तर दिलं नाही. काल समीर भुजबळ सांगत होते की, आम्हाला सहनभूती वाटत होती. म्हणून आम्ही त्यांना पैसे देणार होतो. पण कधीही पैसे दिले?, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
समीर भुजबळ यांनी सांगितलं की, अंजली दमानिया बाई सुपारीबाज आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा नवरा खूप चांगलं कमावतो आणि टॅक्स पण भरतो तुमच्यासारखा नाही… सुपारीबाज लोक तुम्ही आहात. तुमच्या विरोधात कधीच एफआर झाली पाहिजे होती. माझ्यासोबत आलेल्या या भगिनीचा हा बंगला आहे. तो वडिलांचा यांच्या होता आणि त्यांना तीन मूल होती. पुढे पॉवर एटॉर्नीमध्ये यांच्यावर सगळे होल्ड आलं, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.
काल समीर भुजबळ सांगत होत की आम्हाला सहनभूती वाटत होती. म्हणून आम्ही त्यांना पैसे देणार होतो पण कधी पैसे दिले? तुम्ही यांना 5 फ्लॅट देणार होते. ते अजून का दिले नाहीत? तुम्हाला ती इमारत हडप करायची होती तुम्ही वाट बघत होती. मी 2016 मध्ये यांनी मला कोर्टात हे सगळं सांगितलं. तुमच्यासारखे लोक कोणत्या ही पक्षात जातात आणि ED पासून वाचतात. तुम्ही अजित पवार, सुनील तटकरे हे लोक सगळे सत्तेसाठी युतीत गेला आहात, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.