वेळ ठरली, ठिकाण ठरलं… अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार

Ashok Chavan May He Be Inter In BJP Today : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाची वेळ आणि ठिकाण ठरलं आहे. आज दुपारी हा पक्षप्रवेश होणार आहे.अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी एक आमदारही भाजपत जाणार. वाचा सविस्तर...

वेळ ठरली, ठिकाण ठरलं... अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 9:01 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

कुठे आणि कधी होणार पक्षप्रवेश?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीही काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. आता काँग्रेसचे कोणते नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत जातात हे पाहणं महत्वाचं असेल.

आजच प्रवेश का?

केंद्रीय मंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे. पण राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतील त्यानंतर ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतील.

काँग्रेसला सोडचिठ्ठी

काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याच्या पत्रावर माजी विधानसभा सदस्य,असं लिहिलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याआधीच आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.