मुंबईतल्या बॅचलर मुलींच्या रुममध्ये भिंतीवर लावलेला हा शेवटचा नियम मुलांनी न वाचलेला बरा

बॅचलर मुलींच्या रुममधील नियम हे आधुनिक काळाप्रमाणे बदलत जाणारे आहेत, मोबाईल फोन आणि ब्रॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड संस्कृतीने काही नियम बदलले आहेत.

मुंबईतल्या बॅचलर मुलींच्या रुममध्ये भिंतीवर लावलेला हा शेवटचा नियम मुलांनी न वाचलेला बरा
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:25 AM

मुंबई : बॅचलर लाईफ हे फार वेगळं असतं,ते पुन्हा आयुष्यात कधीच येत नाही, नंतर फक्त आठवणींचा सुगंध असतो, तो सुगंध जुनेमित्र भेटले की न सांगताच अधूनमधून तो दरवळतो, बॅचलर लाईफमध्ये मुलं-मुलं आणि मुली-मुली असा भेदभाव करता येत नाही. पण बॅचलर मुलींच्या रुममधील नियम हे आधुनिक काळाप्रमाणे बदलत जाणारे आहेत, मोबाईल फोन आणि ब्रॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्ड संस्कृतीने काही नियम बदलले आहेत. पण बॅचलर मुलींच्या रुममध्ये नेमके काय नियम असतात याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे, म्हणून हे नियम व्हाटसअपवर व्हायरल झाले आहेत.

या नियमांमध्ये शेवटचा नियम जो आहे त्यामुळे हा फोटो जास्त व्हायरल झाला आहे. हा शेवटचा नियम वाचून मुलांना तर नक्कीच हसू येईल, यात मंडळाची रुम असा उल्लेख केला आहे. मंडळाची रुममध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतीच्या मालकीची रुम मुंबईत असते, तेथे शिक्षण, रोजगाराला मुंबईत आलेली मुलं राहतात. शेवटी प्रत्येकाला त्याच्या करिअर आणि रोजगाराची लढाई लढायची असते. पुण्यात जास्त विद्यार्थी असता, तर मुंबईत नोकरी करणारे बॅचलर एकत्र राहतात.

बॅचलर्स एकत्र राहायला लागले की, अनेक कारणांवरुन त्यांचे खटके उडतात, अगदी रुम साफ करण्यापासून ते बाहेर येण्याजाण्याची वेळ यावरुनही हा संघर्ष असतो. ही ठिणगी पुन्हा पुन्हा पडू नये म्हणून, रुममध्ये काही नियम बनवले जातात.रुमचे सदस्य बसून ही रुमची आचारसंहिता ठरवतात.अशीच एक रुमधील नियमांची आचारसंहिता व्हायरल झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील बॅचलर मुलींच्या रुममधील भिंतीला चिटकवलेली नियमांची यादी

(ही यादी फोटोत अस्पष्ट दिसत असल्याने खाली जशीच्या तशी वाचा)

शेवटी बॅचलर राहताना अखेर एक परिवारचं असतं, पण नियोजन करताना नियम बनवावाचं लागतो, परिवारात सावधान करण्याचीही तशी एक यंत्रणा असतेच की, तसंच या शेवटच्या नियमातही काही दडलं आहे.पाहा मुलींच्या रुममधील या शेवटच्या नियमाने कसं आपल्या मैत्रिणींना सावध केलं आहे. कारण बाजूला मुलांची रुम आहे.

शेवटचा नियम मुलींना मुलांपासून सावध करणारा

चर्चा मुलींच्या रुममधील नियमांची होत असेल, तर मुलांच्या रुममध्ये देखील असे हसू न आवरता येणारे नियम नक्कीच असतील.हा शेवटचा नियम मुलांना पटोनापटो पण मुलींना सावध करणारा आहे, हे नक्की.

मुंबईतील बॅचलर मुलींच्या रुममधील भिंतीला चिटकवलेली नियमांची यादी

(ही यादी फोटोत अस्पष्ट दिसत असल्याने खाली जशीच्या तशी वाचा)

१) रुममध्ये येण्याचा टाईम रात्री १२ पर्यंतच

२) फोनवर बोलताना आजूबाजूला ऐकायला जावू नये याची काळजी घेणे

३) रात्री ११ वाजता रुममधील लाईट बंद होतील, (त्यानंतर कोणी आल्यास मोबाईलचा टॉर्च लावून आपले काम आवरावे)

४) आपल्या वस्तू, आपले कपडे, आपली चप्पल नीट ठेवावी.

५) आठवड्यातून ज्याचा नंबर असेल त्याने आपले वर्कआऊट वेळच्या वेळी करावे.

६) मोबाईल ऐकताना एअरफोनचा वापर करावा.

७) अंघोळीची वेळ प्रत्येकाला १५ मिनिटं असेल.

८) पाण्याचा वापर जपून करावा.

९) आजूबाजूला मंडळाच्या रुममध्ये मुले राहतात, तर त्यांच्याशी कुणीही संवाद साधू नये.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.