बागेश्वर बाबा मुंबईत दाखल, आज हायव्होल्टेज ड्रामा घडणार? भक्तांच्या नजरा ‘या’ कार्यक्रमाकडे…
Bageshwar Baba | बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे आज पहाटेच मुंबईत आगमन झाले आहे. मीरारोड येथे त्यांचा दोन दिवस कार्यक्रम होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई | मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) ऊर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Dham) आज पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत. आज आणि उद्या मीरारोड येथे बागेश्वर बाबा यांचा दरबार आयोजित करण्यात आला आहे. धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग आणि त्यांच्या दर्शनाची उत्सुकता महाराष्ट्रातील असंख्य भाविकांना आहे. मात्र बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या बागेश्वर बाबांचा कार्यक्रम मुंबईत होऊच देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना स्थान नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. बागेश्वर बाबा हे देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेले व्यक्ती आहेत. समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळखी माणसाची माहिती क्षणात सांगणे, अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या दरबारात करत असतात.देशभरातील त्यांच्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने मात्र बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे.
पहाटे मुंबईत दाखल
बागेश्वर बाबा आज पहाटेच मुंबईत दाखल झाले आहेत. मीरा रोडे येथे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस त्यांचा कार्यक्रम होणार आहे. मुंबई विमानतळावर बागेश्वर बाबा आज पहाटेच आले. भाईंदर पश्चिम येथील श्री माहेश्वरी भवनात पोहोचले आहेत. येथेच त्यांचा मुक्काम असणार आहे. बागेश्वर बाबांना पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अनिसची पोलीसांत तक्रार
धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथे 2 दिवस होणाऱ्या दिव्य दर्शनाच्या कार्यक्रमाला विरोध करत अंनिसनेही पोलीसांपर्यंत धाव घेतली आहे. अंनिसचे अध्यश्र श्याम मानव म्हणाले की, आम्ही दिलेल्या तक्रारीत जादूटोणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण नागपुरात झालेल्या त्यांच्या दिव्य दरबारात या कायद्याचे वारंवार उल्लंघन झाले आहे. डॉक्टरची पदवी नसलेल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवर उपचार करण्याचा दावा केला तरी ते कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच संत तुकाराम महाराजांच्या वक्तव्यामुळे देखील बागेश्वर बाबांना वारकरी संप्रदायाकडून विरोध होत आहे.
आयोजकांचे म्हणणे काय?
दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजक आमदार गीता जैन यांच्यासमोर आता मोठं आव्हान आहे. काँग्रेस, अंनिस आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधासमोर बाहेश्वर बाबांचा कार्यक्रम यशस्वी होतोय, का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत मीरा भाइंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत. गीता जैन म्हणाल्या, ‘ काँग्रेसने विरोध केला आहे. हिंदू धर्मांचे साधू संत जेव्हा येतात कांग्रेस विरोध करतात, दुसऱ्या धर्माचे साधू जेव्हा येणार त्याचाही कांग्रेस विरोध करणार का? धर्मात राजकरण आणून चालत नाही. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्याकडे एक राष्ट्रीय संत येत आहेत. त्यांना विरोध करु नये आणि कार्यक्रम शांततेने पार पडूद्या . अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर मध्ये विरोध केला होता बाबांना तिथे क्लिनचीट मिळाली. प्रत्येक धर्मांचे गुरु आपआपल्या धर्मांचे प्रचार प्रसार करतात ..आमचे सनातनचे गुरुजी आपल्या धर्माचे प्रचार करत आहे..
1 लाखांपर्यंत भाविक येणार?
या कार्यक्रमात जवळपास 50 हजार ते एक लाखा पर्यंत भाविक येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.. मिरा रोडच्या एस. के. स्टोन ग्राउंड येथे बागेश्र्वर धीरेंद्र शास्त्री यांचे दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे.. 18 आणि 19 मार्च रोजी संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत चालणार आहे.